नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
अहमदनगर/प्रतिनिधी – शेवगाव तहसील कार्यालय मध्ये आज पाथर्डी चे प्रांत अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी नेते व साखर कारखानदार यांच्यातील ऊस दराची बैठक वादळी झाली. मात्र बैठकीमध्ये ऊस दराबाबत कोणताही निर्णय झाला नाही. यावेळी बैठक संपल्यानंतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी साखर कारखानदारांचा जाहीर निषेध व्यक्त केला व मोठी घोषणाबाजी केली.
शेवगाव तालुका शेतकरी संघटने कडून गेल्या दोन महिन्यांपासून ऊस दरबाबत विविध मागण्यांचे निवेदने साखर प्रशासन व शेवगाव तहसीलदार यांना देण्यात आली होती. वेळोवेळी यावर शेवगाव तहसीलदार यांनी बैठकाही आयोजित केल्या. शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात मागील गळीत हंगामातील ३०० रुपये व चालू वर्षीच्या गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन ३१०० रुपये पहिला हप्ता मिळावा. या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेले दोन महिने प्रशासन व साखर कारखानदार यांच्याकडे पाठपुरावा केला.
१५ नोव्हेंबर रोजी शेवगाव पैठण रोडवर घोटण येथे गंगामाई फाट्यावर शेतकरी संघटने कडून ऊस वाहतूक रोखून आंदोलन करण्यात आले होते. परंतु यावेळी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी मध्यस्थी करून आज २१ नोव्हेंबर रोजी शेवगाव तहसील कार्यालयावर पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दराबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु आज झालेल्या बैठकीला साखर कारखानदारांनी कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. व २७०० रुपये प्रति टन ऊस दरावर साखर कारखानदार ठाम राहिले. त्यामुळे आज तहसील कार्यालयामध्ये झालेली बैठक ही वादळी ठरली या बैठकीमध्ये कोणताही निर्णय न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी साखर कारखानदारांचा तसेच शेवगाव पाथर्डी चे लोकप्रतिनिधी यांचाही निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे म्हणाले की सर्व साखर कारखानदार यांचा अंतर्गत संगनमत होऊन २००० रुपये दर हा अंतिम टप्प्यात जाहीर करण्यात आला. असा आरोप लवांडे यांनी केला.
यावेळी शेवगाव पातळीचे प्रांत अधिकारी प्रसाद मते, शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश कचरे, तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते. तसेच कारखानदारांकडून साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.