नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – देशभर फुटीरवादाचे राजकारण सुरूच आहे, आमदार, खासदार ,स्थानिक नेते पक्षांतर करतात. महाराष्ट्र देखील ह्यात मागे नाही. सध्या राज्य सरकार ज्या पद्धतीने राजकारण करत आहेत त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले कि, राज्य सरकार हे कुरघोडी करणारे सरकार आहे. उद्धव साहेबांनी म्हटल्याप्रमाणे एक फुल दो हाफ असे सरकार आहे.
संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे दंगलीची चौकशी करायला काही हरकत नाही कारण संजय राऊत साहेब जे सांगतात ते सत्य आहे. शेवगाव, अकोला, संभाजीनगर, कोल्हापूर, संगमनेर या सर्व दंगली पूर्वनियोजित आहे यामध्ये कोणावर सरकारने कुठेही कारवाई केलेली नाही. असे दानवे म्हणाले.
देशाचं आर्थिक स्तोत्र मुंबई असल्यामुळे फक्त मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी नाही तर केंद्राची पण आहे. मुंबई फक्त महाराष्ट्राची राजधानी पुरती मर्यादित नसून देशाची आर्थिक राजधानी आहे . मुंबई काय एक महानगरपालिकेपुरते मर्यादित शहर नाही मुंबईमध्ये अनेक यंत्रणा काम करतात. आजही गल्ली -गल्ली मध्ये शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न होत आहे. आज कोणत्याही उपमुख्यमंत्र्याला वाटते की मी मुख्यमंत्री व्हावे त्यात काही वावगे नाही. असे दानवे यांचे म्हणणे आहे.
-.