प्रतिनिधी.
मुंबई – बँड पथक/ ढोल ताशे वाजवायचा व्यवसाय हा सिजनल व्यवसायआहे. उन्हाळ्यातील आणि दिवाळीतील लग्नसराई, गणपती, देवी या काळात मोठ्या प्रमाणावर धंदा असतो. गणपतीवेळी तर मुंबई, पुण्यात पूर्ण महाराष्ट्रातून बँड/ढोल ताशा पथके येतात एवढा धंदा या काळात असतो. पण लॉकडॉऊन मुळे या व्यवसायातील लोकांचा महत्वाचा सिजनच घरात बसून जात आहे.या व्यवसायातील लोकं अगदी सामान्य गरीब असलेली लोक आहेत. 4-5 महिने झाले काम बंद आहे अश्यात या लोकांनी आपले घर कसे चालवावे? सहा महिने उलटूनही हाताला काम नाही. तेंव्हा या लोकांनी जगायचे कसे? हा प्रश्न वाजंत्री व्यवसायातील लोक सरकार कडे करत आहे.
मुंबई चेंबूर येथील प्रभात बँड चे मालक बाळासाहेब लंकेश्र्र हे हा व्यवसाय ५० वर्षपासून करतात.मार्च ते जून या महिन्यात त्यांचा वाजंत्रीचा व्यवसाय मुख्यतःअसतो त्या दरम्यान या वेळ लॉक डाऊन असल्यामुळे आता त्याच्यावर व त्याच्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता गणपतीमध्ये सुद्धा त्यांचा व्यवसाय हा जोरात असतो पण आजूनही वाजंत्री व्यवसायाला सरकार कडून परवानगी नाही त्या मुळे आम्ही कस जागाव म्हणून ते सरकार कडे मदतीची याचना करीत आहे. महाराष्ट्रात प्रभात बँड सारखे मोजता असंख्ये वाजंत्री पथके आहेत सरकारने या पथकासाठी लवकरात लवकर काही उपाय योजना करावी. नाही तर कोरोनाने मरण येइल तेव्हा येईल पण त्या आधी या लोकांना उपास मारीने मरण येऊ नये. या साठी सरकारने वाजंत्री बँड पथक याचा व्यवसाय करणारे व त्याचे इथे काम करणारे कारागीर याच्या कडे त्वरित लक्ष देऊन त्याचा व्यवसाय कोरोनाचे नियम पाळून कशा पद्धतीने चालू करता येईल यावर काही तरी उपाय योजना काढून लवकरत लवकर या लोकाना मदत करावी हीच या लोकाची जगण्यासाठी अपेक्षा आहे.