नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात आज काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरू झाली आहे. संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी असलेल्या वलगाव मधून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली असून जनसंवाद यात्रेत यवतमाळ मधील कलावती बंदूरकर सहभागी झाल्या आहेत.
या सरकारचा शेतकऱ्यांना बेरोजगारांना त्रास होत आहे.त्यावेळी त्यानी MRGS च्या मंडळींची भेट घेतली असता त्यानी सांगितलं की आम्हाला चार महिन्यांपासून पैसे मिळाले नाही. आणि संजय गांधी निराधारचे सुद्धा मिळालेले नाहीत. सततच्या नापिकीचे पैसे अजून रखडले आहेत. काय करतय सरकार सत्ता कारण करून? असे सर्व सांगत केंद्र व राज्य सरकारच्या पापाची हंडी फोडणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकुर यांनी दिली.