नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – डोंबिवलीत पूर्वेकडील एका चिकन शॉपचे शटर बनावट चवीने उघडुन दुकानातील १८ हजारांची रोकड व मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. विकास बरबटे असे या चोरट्याचे नाव आहे. पोलीस तपासादरम्यान विकास हा याच चिकन शॉपमध्ये काम करत होता. त्याला कामावरून काढून टाकल्याचा राग होता. त्यातच काम नसल्याने विकास कर्जबाजारी झाला होता. त्यातूनच त्याने दुकानात बनावट चावीच्या सहाय्याने शटर उघडुन चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी दुकान मालकाने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता त्याचा तपास पोलीस करीत होते.डोंबिवली पूर्व चार रस्ता परिसरात नथिंग बट या चिकन शॉपचे शटर अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या आधारे उघडुन दुकानात ठेवलेले १८ हजाराची रोकड व मोबाईल लंपास केला होता. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा व तांत्रिक तपासाच्या आधारे एका चोरट्याला बेड्या ठोकल्या. विकास बरबटे असे या चोरट्याचे नाव आहे.कर्ज बाजारी झाल्याने चोरी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आरोपी याच दुकानात कामाला होता. चार महिन्यांपूर्वी दुकानमालकाने त्याला कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे त्याला तो बेरोजगार झाला होता. याचा राग विकासला होता. एकीकडे काम मिळत नसताना त्याच्यावर कर्ज देखील वाढले. कामावरून काढून टाकले. या रागातून विकासने त्या दुकानाची बनावट चावी बनवली. मध्यरात्रीच्या सुमारास या चावीच्या आधारे शटर उघडुन चोरी केली होती. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून अटक केली आहे.