महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

हवेत गोळीबार करणाऱ्या मोबाईल चोरट्यांचा शोध सुरू

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

बुलढाणा/प्रतिनिधी – दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पोलिस बंदोबस्त असल्यावर सुद्धा चोर बेधडकपणे चोरी करण्याचे धाडस करतात. अशीच एक घटना बुलढाण्यातील रामवाडी भागात घडली. मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांनी रस्त्यावरच बंदुकीतून हवेत गोळीबार केला त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेत मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ पुढील तपास करीत आहेत. मलकापूर रेल्वे स्टेशनवर गंगानगर एक्सप्रेस फलाट नंबर एक वर आली असता या फलाट वर तीन युवक बसले होते. त्यांनी एका प्रवाशाचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी आरपीएफचे जवान तेथे धावून गेले. आजूबाजूचे लोकही जमा झाले त्याचवेळी या तिघांनी तात्काळ रेल्वे स्टेशनच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून रामवाडी भागातील रस्त्याने एकामागे एक अंतर सोडून पळ काढला ही बाब स्थानिकांच्या नजरेत आली. नांदुरा रोडवर उभे असलेल्या रिक्षात प्रथम धावणारा बसला त्या मागोमाग दुसरा व तिसरा त्या रिक्षात बसून रिक्षा सरळ नांदुरा दिशेकडे निघून गेली असं सीसीटीव्ही कॅमेरॅत दिसत आहे. त्याप्रमाणे रिक्षात बसणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीच्या हातात बंदूक दिसत आहे.

यासंदर्भात रामवाडी भागातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ते तिघे रेल्वे स्टेशन कडून धावत येत होते दरम्यान त्यांनी हवेत फायर केला. तर पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे तिघे बहुतेक चोरटे असावेत व त्यांना पकडण्यासाठी पाठीमागे लोक धावत असावेत म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा असा अंदाज पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी व्यक्त केला. याप्रकरणी ते तिघे ज्या रिक्षाने पळून गेले त्या रिक्षाचा शोध घेऊन घटना स्पष्ट झाल्यावर पुढील तपास सुरू करण्यात येईल. अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी दिली.

Translate »
×