नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
यवतमाळ/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या आधी आरोप प्रत्यारोपाचा गोंधळ पाहायला मिळतोय. देशाचे पंतप्रधान आणि बीजेपीची सगळी सूत्रे ज्यांच्याकडे आहेत ते म्हणजे पं. नरेंद्र मोदी. गेल्या काही दिवसापासून मोदींच्या नावाचे वारे राज्यात वाहत आहेत. कारण पण तसेच आहे लोकसभा निवडणुकीचे. विरोधी पक्षांच्या मते जर मोदी सत्तेत परत आले तर देशात लोकशाही संपून हुकुमशाही येईल.
वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ आणि भारतीय जनता पक्षाला संपविले. पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी हे स्वतःहून संघ कार्यालयात जायचे. मोदी सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटीसाठी वेळही देत नव्हते. मागील पाच वर्षात मोदी एकदाही संघ कार्यालयात गेले नाही. मोदी यांनी संघ आणि भाजपला संपवले आहे. मोदी हे केवळ चिन्ह ठेऊन निवडणुकीत त्याचा वापर करतात. संघाने मोदींचे त्यांच्या मानगुटीवर बसलेले भूत खाली उतरवले पाहिजे. आम्ही सुरुवात केली आहे, संघाने साथ द्यावी” असे आवाहन संघाला केल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.