नेशन न्यूज मराठी टीम.
दौंड/प्रतिनिधी – उध्दव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्हा नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख शरदचंद्र सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते,पदाधिकारी यांची आढावा बैठक 12 जुलै रोजी कुरकुंभ या ठिकाणी पार पडली.बारामती लोकसभा अंतर्गत दौंड विधानसभा मतदार संघात आगामी काळात संघटनात्मक बांधणी आणि आगामी काळात येऊ घातलेल्या स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. काहींनी जरी बंडखोरी जरी केली असली तरी शिवसेना ही कायम पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे व मतदार संघातील तमाम शिवसैनिक युवा सैनिक हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मतदार संघातील तमाम शिवसैनिक युवा सैनिक हा त्यांच्या नेतृत्वावर कायम विश्वास ठेवत राहील,तसेच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकीमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आणखीनच ताकद वाढेल असे मत जिल्हाप्रमुख यांनी व्यक्त केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल सोनवणे,युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश फडके,दौंड शहर प्रमुख आनंद पळसे,विधानसभा क्षेञप्रमुख अजित आटोळे,उपतालुकाप्रमुख सदा लकडे,अमोल काळे,सर्जेराव म्हस्के,मोहन चोरमले,उपशहरप्रमुख विक्रम इंगवलेअजित फुटाणे,अजय कटारे, विधानसभा समन्वयक छबू पिसे, तालुका उपयुवाधिकारी किरण वाळूंजकर,बापू गायकवाड,शिवाजी साळुंके,लक्ष्मण सरोदे,बाळासाहेब होले,योगेश बरळ,भरत फडके, कामगार सेनेचे चांदभाई शेख, डॉ.किशोर कांबळे,पांडुरंग काळभोर,दिपक माने,
डॉ.निखिल नामुगडे,बालासो गायकवाड,मोरेश्वर चुंबळकर,अशोक दिवेकर,अजय आढाव,दत्ता म्हस्के,नवनाथ कुंभार,किरण चव्हाण,इत्यादी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते