नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – विदर्भात कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु असताना राणा दाम्पत्य व यशोमती ठाकुर यांनी एकमेकांवर चांगलीच चिखलफेक केली आहे. आता यांच्या वादात बच्चू कडू यांची उडी घेतली आहे. दोन्ही लोकप्रतिनिधींची शाब्दिक शेरेबाजी पाहता बच्चू कडू म्हणाले कि, अमरावती जिल्ह्याची परंपरा फार चांगली राहली आहे.आणि ती परंपरा चांगली ठेवण्याचा काम आमचं सगळ्या लोक प्रतिनिधीच आहे.
काही दिवसांपासून उठ सूट सगळ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न राणा दांपत्याकडून केला जात आहे. राणा दांपत्य हे खालच्या स्तरावर जाऊन आरोप करत आहे. नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याच्या आरोपावरून बच्चू कडू आक्रमक झाले, एका आमदाराने दुसऱ्या आमदारावर आशी टीका करणे योग्य नाही. पुढे बच्चू कडू म्हणाले पैसे घेतले असेल तर निवडणूक आयोग व पोलिसांनी कारवाई करावी. पैसे घेतल्याच्या आरोपावर अमरावती सिपी व आयजी कडे याची तक्रार करावी व चौकशी करण्याची मागणी करावी. राणा दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच अभय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राणा दाम्पत्यावर आवर घालावा.मी या प्रकरणाची तक्रार करणार आसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.