नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – अमरावतीत प्रहार जनशक्ती चे उमेदवार प्रशांत बूब आणि भाजपकडून नवनीत राणा यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार आहे. त्यामुळे अमरावतीत नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू आहे.
आमदार बच्चू कडू व भाजपा उमेदवार नवनीत राणा या दोघांनी 24 एप्रिल रोजी अमरावतीचं सायन्सकोर मैदान सभेसाठी मागितलं आहे. सध्या बच्चू कडू प्रहार जनशक्तीचा प्रचार करत आहेत. या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले “मला मैदान सोडण्यासाठी प्रशासनाकडून दबाब टाकण्यात येत आहे. मी मैदान सोडणार नाही, 24 तारखेला मोठं शक्तिप्रदर्शन करणार. सभेसाठी भाजपा उमेदवार नवनीत राणांनी हेच मैदान मागितलं आहे. जर जबरदस्तीने मैदान आमच्या कडून हिसकावून घेतलं तर प्रचार सोडून उपोषणाला बसू. तसेच उद्या जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन जबाबदार राहणार.” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी मैदान घेऊ नये म्हणून फोन केले त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी देखील बच्चू कडू यांनी केली आहे.