नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणूकीला काही दिवसच उरले आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाने आपला प्रचार करण्यास सुरुवात केलेली आहे. कल्याण लोकसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील उमेदवार वैशाली दरेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कल्यानात प्रचार करायला सुरुवात केलेली आहे.
महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभेतील उमेदवार वैशाली दरेकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या “आमचा प्रचार जोरात सुरू आहे. लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज कल्याण मध्ये सगळ्या कार्यकर्त्यांसोबत प्रचार करण्यात आला तसेच स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिना निमित्त कल्याण मधील स्वामींच्या मठात जाऊन आशीर्वाद घेतले आहेत. स्वामींचे आशीर्वाद आम्हाला आहेतच शिवाय लोकांचा आम्हाला उदंड प्रतिसाद मिळतोय त्यामुळे या वेळेस बदल हा होणार आणि मशाल संसदेत जाणार.”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडीला वेग आल्याचे दृश्य आहे. विरोधी पक्ष राज ठाकरेंवर टीका करत आहेत. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे या त्यांच्या भूमिकेविषयी महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभेतील उमेदवार वैशाली दरेकर यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या “त्यांची भूमिका आहे याविषयी मी बोलणे मला उचित वाटत नाही. काय भूमिका घ्यायची हा त्यांचा विषय आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. जनता महाविकास आघाडीलाच मतदान करणार हे निश्चित आहे, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.