नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – वनमजुरांचे कष्टाचे पैसे देण्यासही वन विभाग कुचराई करताना पाहायला मिळत आहे. २ वर्षांपासूनचा पगार न मिळाल्याने शंभराच्यावर वन मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. उपवनसंरक्षक कार्यलयासमोर अडीच महिन्यांपासून मजुरांनी कुटुंबासह ठिय्या मांडला आहे. पण वनविभाग मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे.
85 व्या दिवशी कौशल्याबाई प्रल्हाद प्रचाके 54 वर्षीय महिलेची प्रकृती सायंकाळी खालवल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र आज सकाळी उपचार सुरू असतानाच त्यांची सकाळी 4 वा प्रकृती अतिशय चिंताजनक होऊन त्यांचा मृत्यू झाला. तरीही मृत्यु आला तरी बेहत्तर पण आम्ही आमचे धरणे सोडणार नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.