नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – देशभरात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या रणधूमाळीची सांगता झाली आहे. पण त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे वेध आता साऱ्याच राजकीय पक्षांना लागले आहे. येत्या 26 एप्रिलला विदर्भातील मतदारसंघात निवडणुकांची रणधूमाळी रंगणार आहे. अमरावतीत भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जाहीर सभा सुरू आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असून काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक सभेला संबोधित करणार आहेत. या सभेसाठी उद्धव ठाकरे व शरद पवार रात्री पासून अमरावती शहरात मुक्कामी आहेत.