नेशन न्यूज मराठी टीम.
रत्नागिरी / प्रतिनिधी – नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केल्यानंतर मच्छीमार बांधव हातामध्ये जाळी घेत समुद्रामध्ये झेप होण्यास सज्ज झाला आहे .तसेच मच्छीमारीला समुद्रातील प्रतिकूल ठरणारे संभाव्य हवामान आणि वातावरण तयाचा अंदाज घेऊन आता मच्छीमारी करावी लागणार आहे. या केलेल्या मच्छीमारी मधून मच्छीमार आपले उदरनिर्वाह करत असतो. रत्नागिरीतील प्रसिद्ध अशा मिरकरवाडा जेटीवर देखील मच्छी व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
यावर्षीच्या नव्या हंगामासाठी मच्छिमार बांधव सज्ज झाले आहेत तसेच होड्यांवरील असणारे खलाशी व तांडेल बंदरामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत त्यामुळे बंदर परिसरातील बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजू लागली आहे .सध्या मासेमारीसाठी प्रतिकूल वातावरण आहे या स्थितीचा अंदाज घेऊन आता मच्छीमार बांधव सज्ज झाले आहेत. समुद्राचे असणारे वातावरण वारा पाऊस त्याचा अंदाज घेऊन दर्याला श्रीफळ अर्पण करून अनेक मच्छीमार मासेमारीला सुरुवात करणार आहेत .एकंदरीत कोकणामध्ये आता खऱ्या अर्थाने मासेमारीला सुरुवात झाली असून मच्छिमार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.