नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/प्रतिनिधी – शिरपूर शहरातील खंडेराव मंदिर जवळ असलेल्या भाजी मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी एका टोळक्याने एका इसमास धारदार शास्त्रासह लोखंडी रोडने जबर मारहाण करून त्या ठिकाणाहून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती, यासंदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली होती, या अनुषंगाने शिरपूर शहर पोलीसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या असून या टोळक्याची परिसरातून पोलिसांनी धिंड काढली आहे,
शिरपूर शहर पोलिसांनी या कारवाई दरम्यान गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे या टोळीतील काही जण हे मांडळ रोड जवळील हॉटेल च्या शेजारी असलेल्या पान टपरीच्या मागे उभे असल्याची माहिती मिळाली मिळाली होती, या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी पोलिसांना देखील त्या ठिकाणी जबर मारहाण करून पाळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातील दोघांना पोलिसांनी पकडले व त्यानंतर इतर फरार साथीदारांना देखील पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेत, एकूण पाच जणांपैकी एक विधी संघर्ष बालक असून या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या सर्व पाचही जणांची शिरपूर शहर पोलीस प्रशासनातर्फे धिंड काढण्यात आली आहे, परिसरात या टोळक्याने उच्छाद मांडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते, आणि या अनुषंगानेच पोलीस प्रशासनातर्फे या सर्व जणांची धिंड काढण्यात आली आहे.