नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – समता, बंधुता आणि शांततेचा संकल्प करीत ‘ महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा कणा व वैचारिक प्रगतीशीलतेचा’ वारसा जगणारे,रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित “लोक-शास्त्र सावित्री”नाटक 27 मार्च 2022 रविवार रोजी सकाळी 11.30 वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली येथे सादर होणार आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या आत सावित्री विचारांचा शोध घेते. जनमानसात सावित्रीबाई फुलेंची ओळख आहे, त्यांचे नाव आहे परंतु त्यांचे तत्व रुजले नाही, आणि हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक करते. सावित्री म्हणजे विचार !प्रत्येक व्यक्तीच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने ती लोप पावते. प्रत्येकाच्या मनातील सावित्रीला चिन्हीत करण्यासाठी हे नाटक पुढाकार घेते.
थिएटर ऑफ रेलेवन्स प्रस्तुत या नाटकात अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे, प्रियंका कांबळे, तुषार म्हस्के, स्वाती वाघ, नृपाली जोशी, संध्या बाविस्कर, आरोही बाविस्कर, तनिष्का लोंढे या कलाकारांनी आपल्या कला साकारल्या आहेत .