नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – पैसे घेवून जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून 60 लाख रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नांदुरा मलकापूर रोडवरिल विश्र्वगांगा हॉटेल समोर घडली होती. तपासादरम्यान नांदुरा पोलिसांनी आरोपीचा छडा लाऊन उत्तर प्रदेश मधून आरोपीला अटक केली आहे. मुंबई येथील अंगडिया अकोला शाखेचे मॅनेजर विक्रमसिंह स्वरुपसिंह मांगलीयार यांच्या हाताखाली कुरीअर सव्हींसचे काम करणारे प्रमोदसिंह मोहनसिंह परमार रा. राजस्थान ह.मु. अकोला हे काम एका ट्रॅव्हल्सने अकोलावरुन 60 लाख रुपये घेवून मुंबईला जात होते. ट्रॅव्हल्स वडनेर भोलजी गावानजीक हॉटेल विश्वगंगा समोर थांबली होती. यावेळी परमार जेवण करण्यासाठी खाली उतरले. मात्र, त्यांनी पैशांची बॅग सिटवरच ठेवलेली होती. यावेळी एका कारमधून काही चोरटे आले व त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये जावून 60 लाख असलेली बॅग घेतली व काही क्षणात कारने बॅग घेवून पसार होते.
काही अंतरावर जावून चोरट्यांनी बॅगमधून पैसे काढून घेतले व जिपीएस मशीन व खाली बॅग फेकून दिली होती. याबाबत प्रमोदसिंह परमार यांच्या तक्रारीवरुन नांदुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द कलम 379 भादंवी नुसार गुन्हा दाखल केला होता.
तर पोलिसांनी पथके स्थापन करून आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटिव्ही व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अजय मुकेश उपाध्याय वय 22 वर्ष रा ग्राम बैगन्दा तहसील धामनोद जिल्हा, धार. राज्य मध्य प्रदेश अटक करण्यात आली असून, त्याच्या कडून चोरीस गेलेले 60 लाख रुपया पैकी 49 लाख रूपये जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील, API नागेश जायले व पोलीस कर्मचारी विक्रम राजपूत, विनोद भोजने, विनायक मानकर यानी ही कार्यवाही केली आहे.