Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image राजकीय

जनता उपाशी आणि नेते मात्र तुपाशी – काकासाहेब कुलकर्णी

नेशन न्यूज मराठी टीम.

सोलापूर / प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. सुरु असलेल्या बैठकीत विद्यमान सरकारवर भाष्य करताना कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हटले कि, महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला छेद देण्याचा प्रकार एकनाथ शिंदे फडणवीस आणि पवार सरकारकडून घडला आहे. शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी हे लोक फाईव्ह स्टार फोर स्टार हॉटेल बुक करत आहेत, स्वतःच्या अंगावर फुल उधळून घेत आहेत. शेतकऱ्याला मिरची तेल आणि भाकरी खायला मिळत नाही मात्र ही लोक पंचतारांकित हॉटेलमध्ये बिर्याणी आणि गुलाब जामुन शिवाय ही लोक जेवत नाहीत. जनता मात्र उपाशी आणि नेते मात्र तुपाशी अशी अवस्था या राज्यामध्ये दिसून आलेले आहे.

अपुऱ्या पावसाभावी मराठवाड्यात अनेक जिह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहे. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर आपले मत व्यक्त करताना कुलकर्णी म्हणाले, राज्यामध्ये कोणालाही सुखी ठेवायचे नाही हे राज्य शासनाचे धोरण आहे. राज्य शासनाला कोणतीही जाण नाही कोणतीही लाज नाही, हे निर्लज आणि गेंड्याच्या कातडीचे हे सरकार आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना देखील खऱ्या अर्थाने राज्यात अवैद्य धंदे सोलापूरमध्ये सुरू आहेत ,याचे मी पुरावे द्यायला तयार आहे, असं कोमल ढोबळे यांनी प्रेस मध्ये सांगितले आहे. हे जर वास्तव असेल तर तात्काळ गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. असे कुलकर्णी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X