नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाभरातील समस्त ओबीसी बांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मागणी करण्यात आली आहे की मराठा समाजाला आरक्षण स्पेशल कोट्यातून द्यावे मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणालाही घुसखोरी करू देणार नाही आणि घुसखोरी केली तर पूर्ण राज्यातील 52 टक्के ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरेल असे आंदोलकांनी सांगितले.
ओबीसी समाजाला अगोदरच हा समाज 52% आहे त्यात आम्ही जास्त लोकसंख्येने असल्याने आम्हालाच याचा लाभ कमी मिळत आहे आणि त्यात पुन्हा मराठा कुणबी समाजाची भर पडल्याने ओबीसी समाजावर पूर्णतः अन्याय होईल व यामध्ये समाजाचे खच्चीकरण होईल त्याकरिता सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना योग्य तो विचार करून आरक्षण द्यावे असे मत ओबीसी महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक अण्णा पांगरकर यांनी व्यक्त केले.