नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – सरकारी उद्योगाचे खाजगीकरण झाल्यानंतर आता शासकीय उद्योगधंद्यात , प्रशासकीय सेवेत यापुढे कंत्राटी भरती होणार आहे. अन खाजगी कंत्राटदार हि भरती करणार आहेत. राज्यात अश्या पद्धतीने भांडवलदारांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतले जात असताना कंत्राटी भरतीने नोकरीची स्वप्ने पाहणाऱ्या युवकावर उपासमारीची वेळ सरकार आणू पाहत आहे. राज्यशासनाने यासंदर्भात जी आर काढल्याने निषेध व्यक्त केला जात आहे.संभाजीनगर येथे देखील असे आंदोलन केले गेले.
महाराष्ट्र राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर काढल्याने त्याच्या विरोधात क्रांती चौकामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी खुर्च्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नावाचे बॅनर ठेवून निषेध दर्शवण्यात आला. 75 हजार या कंत्राटी नोकरीची भरती करण्यात असून सदर भरती करू नये. जर अशा पद्धतीच्या भरती केल्या तर तरुण हा रस्त्यावर उतरेल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.