महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी ताज्या घडामोडी

कोटींच्या नफ्याने नंदुरबार बाजार समितीला केले मालामाल

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नंदुरबार/प्रातिनिधी – खानदेशातून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषीमालांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. मिरची, कांदा, कापूस, धान्य, भाजीपाला खरेदी विक्रीतून बाजार समितीला फायदा झालेला आहे. यंदा नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीला 5 कोटी रुपयांचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळालेले आहे. त्यातून 1 कोटी 68 लाख रुपयांच्या नफा झालेला आहे. प्रथमस्थानी सर्वसामान्य शेतकरी हित लक्षात घेऊन घेतलेले निर्णय आणि शेतमजूर, संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी तसेच व्यापारी त्यांच्या सहकार्यातून हे शक्य झाल्याचे सभापती विक्रमसिंग वळवी यांनी सांगितले.

1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 अखेर 5 कोटी 36 लाख 54 हजार 193 रुपयांचे विक्रमी उत्पादन मिळाले. त्यातून 3 कोटी 67 लाख 86 हजार 763 रुपये खर्च झाला असून,1 कोटी 68 लाख 67 हजार 430 रुपये घसघशीत नफा मिळालेला आहे. परिसरात कांदा व मिरची तसेच अन्य मालांचे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून उत्पादन घेण्यात आल्यामुळे बाजार समितीत दररोज शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत होती. त्याच्या परिणाम म्हणून घसघशीत उत्पन्न मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मागील काही काळ सोडला तर गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत आमच्या गटाची सत्ता आहे. संचालक मंडळाचे सुयोग्य नियोजन, काटकसर शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय व शेतमजूर, हमाल-मापाडी, व्यापाऱ्यांचे अनमोल सहकार्यातून बाजार समितीला चांगले दिवस आले आहे. भविष्यात अजून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन बाजार समितीला कश्या प्रकारे लाभ मिळेल यासाठी योग्य निर्णय घेण्यात येतील असे सभापती विक्रमसिंग वळवी यांनी सांगितले.

Related Posts
Translate »