कल्याण/प्रतिनिधी – कल्याण- भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम मध्ये निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. मतदार यादी मधून हजारो नागरिकांचे नाव गायब होण्याचा धक्कादायक म्हणजे ज्या मतदारांनी इथून मागे दोन-तीन वेळा मतदान केले त्या मतदारांचं देखील नाव निवडणुकीच्या यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे अवधूत दातार नावाचा तरुण अमेरिकेहून कल्याणमध्ये फक्त मतदानासाठी आला होता. मात्र त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याचे पाहून त्याला देखील धक्का बसला आहे. आज सकाळपासून ते विविध मतदान केंद्राच्या फेऱ्या मारत आपले नाव शोधत आहे. मात्र अखेर त्याचं नाव कुठेच नसल्याने त्याच्या पदरी निराशा आली आहे. याबाबत नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला हीच लोकशाही आहे का असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे.