नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – देशात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण हे रस्त्यावरील अपघाताने होत असतात. अन ह्या अपघातांचे प्रमुख कारण रस्त्यांवरील खड्डे हे आहे. महाराष्ट्रात देखील ह्यात मागे नाही. सध्या राज्यात रस्त्यावरील खड्ड्याची अवस्था पाहता ह्या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. अशीच बिकट अवस्था बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर गेले कित्येक वर्षे दिसून येते आहे.
रावेर तालुक्यातून गेलेल्या बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. यामुळे या रस्त्यावर लहान मोठे अपघात होण्याची मालिका कायम सुरूच आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीकडून राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या ९९३ खड्ड्यांमध्ये बेशरम जातीची झाडे लावून अनोखा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
ह्यावेळी माध्यमांशी बोलताना शामिभा म्हणाल्या कि, महाराष्ट्र व मध्यप्रदेश ह्या दोन राज्यांना एकत्रित जोडणारा हा रस्ता असून, गेल्या तीन वर्षाचा आढावा घेतला असता , दर महिन्याला पाच अपघात येथे होत आहेत. येथील खड्डे मोजून त्याठिकाणी बेशरमाचे झाड लावून ,प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आदोलन असून केंद्र सरकारकडून ह्या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आलेल्या निधीत साधे खड्डे बुजविले जात नाहीत ह्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी वंचित बहुजन युवक आघाडीच्या राज्य कार्यकारीण सदस्या शमिभा पाटील, अम्रपाली जान, राखी सूर्यवंशी, चांद तडवी, प्रतिक दामोदरे, प्रकाश तायडे, दिपक कोंघे, भिका अटकाळे, जिवराम बेलदार, शंकर लहासे आदी उपस्थित होते.