नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील विकासाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवकौठे येथे विविध विकासकामांसह देवकौठे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते पार पडला.देवकौठे ग्रामस्थ,विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या वतीने माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शिंदे फडणवीस सरकार वर थोरात यांनी टीकेची तोफ डागली ते म्हणाले महायुती सरकार हे भांडवलदारांचे असुन शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे सरकार आले आहे.हे केंद्र सरकार व राज्य सरकार हे फक्त भांडवल दरांचे सरकार आहे.या सरकारने शेत विम्याचे पैसे शेकार्यांना दिले नाही. पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पैसे शेत्कार्र्याना दिलेले नाही , पण आता हे जास्त काळ चालणार नाही येणारे सरकार हे आमचे असेल आणि त्यावेळी जास्त चांगली कामे आपण करू असेही ते म्हणाले.
.यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले.देवकौठे सोसायटीच्या नूतन इमारत विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी जी.प सदस्य महेंद्रशेठ गोडगे, राजहंस दूध संघाचे संचालक तसेच कांदा व्यापारी भारतशेठ मुंगसे, नाशिकचे माजी नगरसेवक भागवतराव आरोटे,युवक काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा उत्तर कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे,नीलकामल उद्योग समूहाचे एकनाथराव मुंगसे,चिंचोली ग्रामपंचायतचे सरपंच विलास सोनावणे,हौशीराम सोनवणे,सरपंच,उपसरपंच,विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते ग्रामस्थ,महीला भगिनी,तळेगाव गटातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.