नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीस शिताफीने अटक करून ३ गुन्हे उघडकीस आणुन ६ लाख २४ हजार ३५५ रु किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, एलइडी टि.व्ही, रोख रक्कम हस्तगत केली असून तसेच ४५ लाख ४ हजार रोख रक्कमेचा अपहार करून पळुन गेलेल्या नोकरास त्याच्या साथीदारासह राजस्थान येथून अटक करून ४१ लाख १५ हजार रोख रक्कम जप्त करत एकुण ४७ लाख ३९ हजार ३५५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी केली आहे.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि अशोक होनमाने, पोनि (गुन्हे) प्रदीप पाटील, पोनि श्रीनिवास देशमुख, सपोनि. दिपक सरोदे, पोउपनि तानाजी वाघ, सपोउपनि विजय भालेराव, पोहवा जाधव, पोना कांगरे, पोहवा भाट, ठिकेकर, चित्ते, हासे, भोईर, पोना मधाळे, पोशि गामणे, थोरात, दिपीका पडवळ यांनी केली आहे.
२१ मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान कल्याण पश्चिमेतील ६५ वर्षीय महिलेच्या घरातील एकुण ५ लाख ७९ हजार ५०५ रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, एलइडी टि.व्ही, रोख रक्कम व इतर मालमत्ता चोरी केल्याची घटना घडली होती. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथक तयार केली. तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सतत ५ दिवस अथक परिश्रम घेवुन सापळा रचुन वॉच करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळवून जावेद अख्तर मोहमद सलीम शाह (२७) याला भिवंडी येथुन ताब्यात घेतले.
त्याच्याकडे तपास केला असता, त्याने हा गुन्हा व त्याव्यतिरिक्त रामबाग कल्याण प. येथे दोन घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे कबुली दिली आहे. आरोपीकडुन ३ घरफोडीच्या गुन्हयातील एकुण ६ लाख २४ हजार ३५५ रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, एलइडी टि.व्ही., रोख रक्कम हस्तगत करून हे गुन्हे उघडकीस आले आहेत.
तसेच २५ मार्च रोजी ५१ वर्षीय सराफा व्यवसायीकाच्या भावाच्या मुलाने त्यांच्याकडे काम करीत असलेला आरोपी रमेश झुंजाराम देवासी याला ४५ लाख ४ हजार रू रोख रक्कम असलेली बॅग बँकेत भरणा करण्यासाठी विश्वासाने सोपविली असता. या रक्कमेचा अपहार करून पळुन गेला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथक तयार केले. आरोपीची माहीती मिळवून रमेश झुंजाराम देवासी यास त्याचा साथीदार जगदीश भोलाराम देवासी याने मदत केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार एक पथक राजस्थान व एक पथक गुजरात येथे रवाना झाले होते. तपास पथकांनी आरोपी जगदीश भोलाराम देवासी यास राजस्थान येथुन अटक केली असुन गुन्हयातील अपहार केलेले ४१ लाख १५ हजार रू. रोख रक्कम हस्तगत केली आहे. या गुन्हयातील पुढील तपास सपोनि दिपक सरोदे हे करीत आहेत.