Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

रस्त्यावर वाहनांना अडवून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद

नेशन न्यूज मराठी टीम.

धुळे/प्रतिनिधी – रस्त्यावर वाहनांना अडवून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाचे प्रमुख पीआय हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याचे चार साथीदार फरार असले तरी ते एलसीबीच्या रडारवर आहेत. त्यामुळे लवकरच रस्ता लुटीतील चौघे आरोपी देखील गजाआड होतील. विशेष म्हणजे या टोळीतील दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे.

धुळे तालुक्यातील हेंकळवाडी येथील समाधान ब्रिजलाल पाटील हा तरुण त्याच्या एम. एच. ४६ बी.बी. ९६७० क्रमांकाच्या महेंद्र पीकअप गाडीने नवलनगरकडून नंदाळे गावाकडे जात असताना अंबोडे ता. धुळे गावच्या शिवारात डोंगराजवळ ४ लुटारु स्फिट कारमधून आले, त्यांनी समाधान पाटील यांचे वाहन अडवून त्याच्याकडून जबरदस्तीने चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन आणि १० हजार रुपयांची रोकड हिसकाऊन घेतली असल्याची घटना काल रात्री घडली.

याप्रकरणी पीकअप चालक पाटील यांनी धुळे तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. लुटारुंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी एलसीबी पीआय हेमंत पाटील यांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, रमजान मेहबुब पठाण रा. वडजाई रोड याने केल्याचे समजल्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

रमजानला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विजय रामकृष्ण गायकवाड रा. रामनगर, धुळे वसीम हुसेन शेख उर्फ वसीम बाटला रा.जनता सोसायटी, सत्तार मेन्टल रा. पत्रावाली मशीद जवळ यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. हा गुन्हा करण्यासाठी मनोज पारेराव याने स्वीफ्ट कार उपलब्ध करुन दिली व फिर्यादी असलेल्या समाधान पाटील याची माहिती देखील दिली.

रमजान पठाण याच्याकडून पाच हजाराची रोकड व एक हजार रुपये किंमतीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनावरुन धुळे एलसीबी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, प्रभाकर बैसाणे, संजय पाटील, श्रीकांत पाटील, पंकज खैरमोडे, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, मयुर पाटील, अमोल जाधव,जगदीश सूर्यवंशी, विनोद पाठक, योगेश ठाकूर यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X