नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण व पुरस्कार सोहळा रविवारी डोंबिवली येथील मराठा हितवर्धक हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांची उपस्थिती लाभली. तसेच पद्मश्री गजानन माने, निवृत्त सचिव चंद्रकांत माने, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, माजी परिवहन सभापती राजेश कदम, माजी नगरसेवक नंदू धुळे मालवणकर, प्राध्यापक डॉ विनय भोळे, उद्योजक विश्वास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोकण युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. भजन स्पर्धेचे सूत्रसंचालन कुणाल मोरे व विराज चव्हाण यांनी केले तर या भजन स्पर्धेचे नियोजन भजन स्पर्धा प्रमुख सच्चिदानंद हांदे व रोशन मोरे यांनी केले. या बक्षीस वितरण व पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन दिनेश मोरे यांनी केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चाळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोकण रत्न पुरस्कारांमध्ये कोकण भूषण डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई, कोकण समाज भूषण कै. गोपाळराव राणे (मरणोत्तर), कोकण कलायोगी कै. नितीन देसाई (मरणोत्तर), कोकण कलारत्न प्रभाकर मोरे, कोकण साहित्यरत्न अशोक लोटणकर, कोकण रत्न पत्रकारिता प्रमोद कोनकर, कोकण समाजरत्न सुनील कदम/ श्रीगौरी सावंत, कोकण शिक्षणरत्न महेंद्र साळवी, सुप्रिया सावंत, कोकण कृषीरत्न सचिन आणि समीर अधिकारी, कोकण क्रीडारत्न राहुल जाधव, कोकण शौर्यरत्न शिवाजी बने, कोकण उद्योगरत्न विशाल जाधव यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित भजनोत्सव स्पर्धेत पुरुष गटात विष्णू स्मृती संगीत प्रसारक भजन मंडळाला प्रथम क्रमांक, लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाला द्वितीय क्रमांक तर श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. सर्वोत्कृष्ट गायक तेजस करगुटकर, सर्वोत्कृष्ट पखवाज वादक गजानन दळवी, सर्वोत्कृष्ट चकवा वादक प्रसाद मडव ठरला.
तर महिला गटात आई भवानी प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक, विठाई भजन मंडळाने द्वितीय क्रमांक, तृतीया भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. सर्वोत्कृष्ट गायिका ऋतिका मुरुडकर, सर्वोत्कृष्ट चकवावादक वरद सिद्धिविनायक भजन मंडळ ठरले.