नेशन न्युज मराठी टिम.
मुंबई – कोकण भागात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. कोकण रेल्वेने आपल्या 740 किलोमीटर मार्गावर नियोजित सुरक्षिततेची कामे पूर्ण केली असून ती आता पावसाळ्यासाठी सज्ज झाली आहे.
कोकण रेल्वे गाड्या पावसाळ्यात सुरक्षितपणे चालवता याव्यात, यासाठी कोकण रेल्वे आवश्यक ती सर्व काळजी घेणे सुरू करणार आहे. सुमारे 846 कर्मचारी पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर गस्त घालतील.असुरक्षित ठिकाणी चोवीस तास गस्त घातली जाईल, चोवीस तास सुरक्षारक्षक तैनात केले जतील,तसेच या ठिकाणी वेगावर निर्बंध घातले जातील. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जलद हालचाल करण्यासाठी, उत्खनन केलेल्या ठिकाणी बीआर एन(BRN) बसविण्यात येतील.
पाणलोटाच्या जागांची साफसफाई, खोदकाम केलेल्या ठिकाणांची तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात भू-सुरक्षा कार्ये राबविली गेल्याने दरड पडण्याच्या आणि माती खचण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, त्यामुळे गाड्या सुरक्षितपणे चालवल्या जात आहेत. गेल्या 9 वर्षांत पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे रेल्वेसेवेत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही.
मुसळधार पाऊस पडल्यास दृश्यमानता मर्यादित असताना रेल्वेगाड्या चालकांना ताशी 40 किमीच्या पेक्षा कमी वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी आणि वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीची तरतूद असलेली स्वयंचलित अपघात निवारण वाहने (सेल्फ-प्रोपेल्ड एआरएमव्ही) सज्ज ठेवण्यात आली आहेत. वेर्णा येथे अपघात निवारण गाडी(एआरटी,ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन) देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.
सर्व सुरक्षा श्रेणी कर्मचार्यांना आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कार्यालय/स्थानकाशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन प्रदान करण्यात आले आहेत. दोन्ही लोको पायलट आणि गार्डना वॉकी-टॉकी सेट प्रदान करण्यात आले आहेत तसेच कोकण रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर 25 वॅटचे व्हीएच एफ(VHF) बेस स्टेशन बसवले आहे, ज्याद्वारे रेल्वेतील कर्मचारी आणि स्टेशन मास्टर यांच्यात वायरलेस संभाषण होऊ शकते. कोकण रेल्वे मार्गावर सरासरी 1 किमी अंतरावर इमर्जन्सी कम्युनिकेशन (EMC) सॉकेट्स (आपत्कालीन संभाषणासाठी बटणे)प्रदान केले गेले आहेत जे गस्तीवर असलेले वॉचमन, लोको पायलट, गार्ड आणि इतर फिरत्या देखभाल कर्मचार्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्टेशन मास्टर आणि नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधण्यास मदत करु शकतील. आपत्कालीन संपर्कासाठी एआरएमव्ही (ॲक्सिडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन) मध्ये सॅटेलाईट फोन संपर्क प्रदान करण्यात आला आहे. सिग्नल दृश्यमानता सुधारण्यासाठी कोकण रेल्वेवरील सर्व मुख्य सिग्नल आता एलईडीने बदलले आहेत.
9 स्थानकांवर स्वतः नोंदणी करु शकतील असे,(सेल्फ रेकॉर्डिंग) पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत,जे माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी या प्रदेशातील पावसाची नोंद करतील आणि पावसाचा जोर वाढल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करतील.तीन ठिकाणी पुलांसाठी पूराची सूचना देणारी चेतावणी प्रणाली बसवण्यात आली आहे,जी काळी नदी (माणगाव आणि वीर दरम्यान), सावित्री नदी (वीर आणि सापे वामणे दरम्यान), वशिष्ठी नदी (चिपळूण आणि कामठे दरम्यान) याठिकाणी पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त झाल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करेल. वाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण करण्यासाठी पानवल मार्ग (रत्नागिरी आणि निवासर दरम्यान), मांडवी पूल (थिविम आणि करमाळी दरम्यान), झुआरी पूल (करमाळी आणि वेर्णा) आणि शरावती पूल (होन्नावर आणि मानकी दरम्यान) या चार ठिकाणी ॲनिमोमीटर बसवण्यात आले आहेत.
बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष, गाड्या सुरक्षितपणे चालवण्यासाठी पावसाळ्यात 24 x7 काम करतील. हे पावसाळी वेळापत्रक 10 जून 2022 पासून 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू असेल.प्रवासी पावसाळ्यात www.konkanrailway.com या संकेतस्थळावर भेट देऊन किंवा Google Play Store वरून KRCL ॲप डाउनलोड करून किंवा 139 डायल करून ऑनलाइन पद्धतीने गाडीची स्थिती तपासू शकतात.
Related Posts
-
गणेशोत्सवासाठी बाप्पांचाही कोकण रेल्वेचा प्रवास
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - कोकणात गणेशोत्सव…
-
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने चाकरमान्यांची तारांबळ
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - ANC :…
-
ऐन पावसाळ्यात पाण्याचे संकट; टँकरद्वारे पाणीपुरवठा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - पावसाची सध्या…
-
बारावीच्या निकालामध्ये कोकण विभागाने मारली बाजी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - शैक्षणिक जीवनात बारावीची…
-
कोकण भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी. नवी मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या…
-
पावसाळ्यात खाल्ली जाणारी कांटोळा भाजी बाजारात दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - तालुक्यातील दुधाळा…
-
कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकण रत्न पुरस्कार सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कोकण युवा…
-
कोकण रेल्वेचे ‘मिशन शंभर टक्के विद्युतीकरण’ साध्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण…
-
गणेशोत्सवासाठी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांकडून कल्याणमधून कोकण बसेस रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - गणेश उत्सवासाठी…
-
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक…
-
कोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होणार
मुंबई प्रतिनिधी- आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची…
-
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदारयाद्यांचे पुनरिक्षण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी- दि. १ नोव्हेंबर, २०२३ या…
-
बाप्पाच्या उत्सवासाठी कोकण प्रवाश्यांचे आगाऊ रिझर्वेशन व ग्रुप बुकिंग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - बाप्पाचा उत्सव…
-
कोकण रेल्वे मार्गाचे आणि इतर रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरू, कर्नाटक येथील…
-
कोकण विभागीय माहिती कार्यालय निर्मित अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. नवीमुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या…
-
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांची कोरोना टेस्ट रद्द करा - कोकण प्रवासी महासंघाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - जनआशिर्वाद यात्रा, आंदोलनं किंवा बैठकीनिमित्त कोकणात येणाऱ्यांना…
-
जागतिक महिला दिनी होणार राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला…
-
मुंबई पोलीसांची अत्याधुनिक एटीव्ही वाहने चौपाटीसह शहरात गस्त घालणार
मुंबई/प्रतिनिधी- मुंबई शहरातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस…
-
नवीन गाड्यांचे नियोजन करून कोकण वासियांचा प्रवास सुखकर करा -आमदार राजू पाटील
कल्याण ग्रामीण/प्रतिनिधी -गौरी गणपती निमित्त मुंबई सह उप नगरातून कोकणात…
-
कोकण वासियांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आ. राजू पाटील यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे - प्रतिनिधीगणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी…
-
पावसाळ्यात रस्त्यावर खड्डा दिसल्यास संबंधित अधिका-यांवर होणार कारवाई
नवी मुंबई/प्रतिनिधी - पावसाळी कालावधीत रस्ते सुस्थितीत असणे हे सर्वात…
-
समर्पित आयोगाचा कोकण विभागीय दौरा,विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी निवेदन देत मांडली भूमिका
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या…
-
आंबिवली स्मशाभूमी गेल्या ५ वर्षांपासून छताच्या प्रतीक्षेत, अंत्यसंस्कार झाल्यावर पावसाळ्यात वारंवार द्यावा लागतोय अग्नी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील स्मशानभूमीमध्ये होणारे…
-
२ ते ९ जानेवारी दरम्यान कोकण प्रांतातील सर्वात मोठा हरिनाम सप्ताह
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्राला अनेक मोठमोठ्या…
-
कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात सामंजस्य करार, ३७ स्थानकांचे होणार सुशोभीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत…
-
कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब वीजग्राहकांकडे ३५६२ कोटी थकीत,थकबाकी भरण्याचे महावितरण कडून आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात सर्व वर्गवारीतील (कृषिपंप ग्राहक…