नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याणात चैन स्नॅचिंग तसेच चोरीच्या कित्येक घटना प्रत्येक दिवशी समोर येत आहेत. पण चोर कितीही हुशार असला तरी तो पोलिसांपासून जास्त दिवस लपून राहू शकत नाही. म्हणूनच म्हणतात न कानून के हाथ लंबे होते हे. याचा प्रत्येय आलाय तो कल्याण मध्ये. कोळसेवाडी पोलिसांनी स्पोर्ट बाईकवर लिहीलेल्या नंबर वरुण एका सराईत चोराला बेड्या ठोकल्या आहेत. कोळसेवाडी पोलिसांनी कल्याणातील काळा तलाव परिसरातून चैन स्नॅचिंग तसेच इराणी चोरट्यांना चोरीची बाईक पुरवणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातून एक महागडी बाईक चोरीला गेली होती. त्या घटनेनंतर तासाभरातच एक दुसरी बाईक देखील चोरीला गेली. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी दिनकर पगारे, पोलिस कर्मचारी सुशील हंडे तसेच अन्य पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. बाईक चोरट्याला शोधण्याकरीता कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील जवळपास १५० सीसीटीव्ही खंगाळण्यात आले. एका सीसीटीव्हीत स्पोर्ट बाईक चालविताना एक तरुण दिसला. त्याने मास्क घातला असल्याने त्याची ओळख पटत नव्हती. बाईकवर ४६ नंबर लिहिलेला होता पोलिसांनी काळा तलाव परिसरात तपासणी सुरु केली त्याठिकाणी ती स्पोर्ट बाईक ज्यावर ४६ नंबर आहे ती आढळून आली पोलिसांनी विचारले ही बाईक कोणाची आहे तर समोर असलेल्या तरुणाने ती बाईक माझी आहे असे सांगितले. अधीकची चौकशी केली असता आधी तरुणाने नाव आणि पत्ता खोटा सांगितला. परंतू पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, तेजस उर्फ आकाश मेघानी असे या चोरट्याचे नाव आहे. तो सराईत बाईक चोरटा आहे.
आरोपी आकाश मेघानी विरोधात विविध पोलिस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी आरोपींकडून ३ महागड्या बाईक हस्तगत केल्या आहे. आकाश मेघानी हा काही साथीदारांच्या मदतीने बाईक चोरी करायचा आणि चोरी केलेली बाईक चैन स्नॅचिंग करणाऱ्या इराणी चोरट्यांना पुरवायचा. आकाश च्या अटकेनंतर काही चैन स्नॅचरचे नाव समोर आले आहे. पोलिस त्याच्या साथीदारांचाही शोध घेत आहेत. लवकर पोलिसांच्या हाती अन्य चोरटेही सापडले जाण्याची शक्यता आहे.