नेशन न्यूज़ मराठी टिम.
ठाणे/प्रतिनिधी– जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्यामार्फत ठाण्यातील चालवण्यात येत असलेल्या आनंद नगर डम्पिंग ग्राऊंड येथील शाळेतील मुलांनी भारताचा स्वांतत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. येथे असणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूच्या परिसरातील राहत असेल्या कुटुंबातील मुलांना त्या परिसरात जाऊन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत तेथील विद्यार्थ्यांसाठी दरोरज मार्गदर्शन वर्ग अभ्यासिका चालवली जाते. या प्रकल्पाला कच-यावरची शाळा असे नाव आहे.
कचऱ्याच्या अस्तावस्त ढिगाऱ्यात आपले भविष्य गाडलेली असंख्य मुल इकडे तिकडे विखुरलेली पाहताना यांच्या भविष्याचं काय ? हा प्रश्न जिजाऊने सोडवण्याचे ठरवले . ठाणे येथील कोपरी परिसरात असणाऱ्या कचऱ्याच्या अवाढव्य डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या झोपडपट्टीतील मुले साक्षर व्हावीत शिक्षणापासून वंचित राहीलेली पोकळी भरून निघावी यासाठी त्यांच्या शालेय स्तरावरील सर्व गरजा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था पूर्ण करत आहे. ज्योती व गुरू हे दोघेही याच कचऱ्याच्या अस्तावस्त ढिगाऱ्यात शेजारी असलेल्या वस्तील दोन निरागस फुलं २०२१ ला १०वी पास झाले असून त्यातील गुरू रॅबिटच्या गाडीवर, तर ज्योती एका घरात धुणी भांडीचे काम करत होती. आता दोघांनीही जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ठाण्यातील हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजला अॅडमिशन घेतले आहे. यांसह इतर अनेक मुलांच्या शिक्षणाची पाऊलवाट जिजाऊ संस्था सुखकर करत आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून डंपिंग ग्राउंड,ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, हरी ओम नगर दामोजी पाटील वाडी, भोईर तलाव, ठाणे (पूर्व), येथे आयोजित कार्यक्रमात कचऱ्यावरची शाळा येथील मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून टाकले होते. तर जिजाऊ संस्थेच्या वतीने उपस्थित मुलांना खाऊचे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.