Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी तंत्रज्ञान

भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेत ‘होम स्टेट दालन’ ठरले लक्षवेधी

नेशन न्यूज मराठी टीम.

नागपूर/प्रतिनिधी – भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेच्या संपूर्ण सहा दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय व पायाभूत सुविधा तसेच विज्ञान  व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती मांडणारा ‘होम स्टेट दालन’ नागरिकांसाठी लक्षवेधी ठरले असून होम स्टेट या प्रदर्शन हॅालला विज्ञानप्रेमींचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.

भारतीय विज्ञान परिषदेच्या परंपरेनुसार प्रत्येक आयोजनामध्ये स्थानिक राज्य सरकारला महत्त्व दिले जाते. त्यामुळे राष्ट्रीयस्तरावरच्या या उपक्रमात राज्याचे एक दालन प्रत्येकवेळी असते. या माध्यमातून देशातील संबंधित राज्याला त्या राज्याच्या विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती व अन्य पायाभूत सुविधा व संशोधन तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगती मांडता यावी, ही यामागील भूमिका असते.

‘होम स्टेट’ या स्टॅालमध्ये राज्याची प्रगती दर्शविणारे अनेक स्टॅाल आहेत.  यात शैक्षणिक,राज्यामार्फत राबविण्यात आलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती राज्याचा प्रगतीचा आलेख दर्शविणाऱ्या दालनात  देण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रातील भरारी ही महाराष्ट्राची ओळख आहे. कृषी मध्ये झालेले वेगवेगळे प्रयोग याठिकाणी बघायला मिळतात. आरोग्य क्षेत्रात राज्याने सुलभ व गतीशील उपचार व्यवस्था विकसित केली आहे. तसेच यासंदर्भातील तंत्रज्ञान विकसित होत आहेत. नागपुरच्या उद्योजकता विकास संस्थांमध्ये निर्माण होणाऱ्या वस्तुदेखील या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. मिहान व अन्य ठिकाणच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमुळे नागपुरची ओळख पुढे येत आहेत. यासंदर्भातील स्टॅाल याठिकाणी आहेत. वृत्तपत्र प्रकाशनासोबतच प्रिंटिंग टेक्नॅालॅाजीमध्ये झालेले प्रयोग व त्यातील तंत्रज्ञान याठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X