नागपूर/प्रतिनिधी – एकदा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांचे काम संपणार नाही. यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. त्यामुळे दोष सिध्दीचे प्रमाण वाढेल अशा रितीने गुन्ह्यांचा तपास करा, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येथे दिले. नागपूर येथे पोलिस मुख्यालयात नागपूर व गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला.
पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून आपण सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटली पाहिजे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवण्याची हिंमत कोणी करू नये, महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल भ्रम निर्माण करणाऱ्यांना पारदर्शी कारभाराने, व्यापक जनसंपर्काने उत्तर द्या, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय करू नका, असे स्पष्ट निर्देश आज त्यांनी या बैठकीत दिले.
या बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, दोन्ही परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस उपअधीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
आजच्या बैठकीमध्ये गृहमंत्र्यांनी पुढच्या दोन महिन्यात विभागातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासंदर्भातील दृष्टिपथात पडेल असे कार्य पुढे आले पाहिजे, असे स्पष्ट केले. बलात्कार आणि लुटमार या संदर्भातील घटनाक्रम गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहे. छोट्या-मोठ्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही संख्या वाढ झाली आहे का ? याचा विचार करण्याची ही योग्य वेळ असून अवैध दारू व व्यसनाधीनता अशा या गुन्ह्यांच्या उगम स्थळांना वेळीच ठेचून काढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, माध्यमे यांच्याकडे आपला पारदर्शी कारभार मांडा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
समाजातील माफिया कोणत्याही स्तरातील असतील, दारू माफिया, वाळू माफिया, मोका केसेस लागलेले घटक यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्या हालचालीची नोंद ठेवा. या विभागात प्रत्येक जिल्ह्याचा गुन्हेगारी दर घटला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ठरवले तर जिल्ह्यामधील गुन्हे कमी होऊ शकतात. ठाणेदाराने ठरवले तर ठाण्याच्या परिसरात गुन्हे घडू शकत नाही. मात्र तरीही गुन्हे का घडत आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. शाळा कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे ही बाब धोकादायक आहे. नव्या पिढीला विश्वासात घेण्याची गरज आहे. पोलिसांची आदरयुक्त भीती निर्माण होण्यासाठी तुम्ही केलेल्या चांगल्या कामाला पुढे आणा, असेही त्यांनी आवाहन यावेळी केले.
तत्पूर्वी त्यांनी प्रथम नागपूर परिक्षेत्रातील गुन्ह्याची नोंद, दोष सिद्धता, प्रतिबंधात्मक कारवाई, मोक्का व अन्य गुन्ह्यांच्या संदर्भातील कार्यवाही, मादक पदार्थ सेवन संदर्भातील घटना, अवैध धंदे, पोलिसांची घरे, वाहनांची उपलब्धता, पदांची कमतरता, पोलिसांमार्फत सुरू असलेल्या सामाजिक कार्य याबाबतचा आढावा घेतला. यावेळी जिल्हानिहाय गुन्हे आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावाही घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांसंदर्भातील गुन्हे, वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी संदर्भातील गुन्हे याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोली परीक्षेत्राचा विशेष आढावा घेताना, या भागातील पोलिसांच्या सुविधा संदर्भात सातत्याने मुंबईला पाठपुरावा करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देशित केले. दर दोन महिन्यात गडचिरोली परिक्षेत्राचे संदर्भात मागणी आणि पूर्तता या बाबतचा आढावा घेतला गेला पाहिजे, असे त्यांनी सुचविले. वाहनांसाठी जिल्हा नियोजनमध्ये प्रस्ताव दाखल करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील काही सामाजिक प्रश्नांना गंभीरतेने ऐकून घेत धोरणात्मक निर्णय घेऊ असा सूतोवाच केला. कोणत्याच परिस्थितीत या जिल्ह्यातील युवक नक्षल चळवळीकडे वळता कामा नये. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास शासन तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी आश्वस्त केले.
Related Posts
-
९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पोलीस दलातील उल्लेखनीय व…
-
लष्करप्रमुखांनी घेतला संरक्षणव्यवस्थेचा आढावा, जवानांसोबत दिवाळी केली साजरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लष्करप्रमुख जनरल मनोज…
-
कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची डीएनए टेस्ट करणार - पोलीस आयुक्त, नागपूर
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - मध्यप्रदेशाच्या हरदा…
-
मुंबई व किनारपट्टीच्या जिल्ह्यांत झालेल्या पावसाचा मुख्यमंत्री यांनी घेतला आढावा
मुंबई/प्रतिनिधी – हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत …
-
राहाता पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाचा विभागीय उपायुक्तांनी घेतला आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी/प्रतिनिधी – नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त…
-
विविध महापालिकांच्या कामाचा नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांनी घेतला आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नगर विकास विभागाच्या प्रधान…
-
कोळसा मंत्रालयाने बंदिस्त खाणींतील कोळसा उत्पादनाचा घेतला आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ज्या कोळसा ब्लॉक्सनी…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या…
-
येवला व निफाड तालुक्यातील कोरोना उपाययोजना याबाबत आढावा बैठक
नाशिक/ प्रतिनिधी - कोरोनाच्या लढ्यात आता नागरिकांची भूमिका अधिक महत्त्वाची…
-
अनुसूचित जाती कल्याण समितीने घेतला विविध विभागांचा आढावा
बुलडाणा/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समितीने आज 5 ऑक्टोंबर…
-
कोरोनाच्या अनुषंगाने केन्द्रीय पथकाने घेतला ठाणे जिल्ह्याचा आढावा
प्रतिनिधी. ठाणे ,दि.२५- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये…
-
गडचिरोली पोलीस विभागाला जिल्हा नियोजन निधीतून ५१ लाखांचे बक्षिस – पालकमंत्री एकनाथ शिंदे
गडचिरोली/प्रतिनिधी - गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे…
-
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा,पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदियास संयुक्त विजेतेपद
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
पोलीस स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
मुंबई/प्रतिनिधी - देशाच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या…
-
रायगड पोलीस दल राज्यातील "बेस्ट पोलीस युनिट अवार्ड" विजेता
अलिबाग/प्रतिनिधी - राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 2023 च्या प्रजासत्ताक…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
जालना लाठीमार प्रकरण, पोलीस महानिरिक्षक यांनी घेतली जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट
नेशन न्यूज मराठी टिम. जालना/प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये जिजाऊ पोलीस अकॅडमीच्या १८८ विध्यार्थ्यांची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - नुकत्याच पार पडलेल्या…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती, पोलीस भरतीसाठी सुरुवातीला होणार शारीरिक चाचणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र शासनाने राज्यात सन…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
प्रतिनिधी. औरंगाबाद - भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या…
-
नागपूर फ्लाइंग क्लबला डीजीसीएची मान्यता
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे डीजीसीएच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची…
-
दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यात…
-
शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावर चालत्या ट्रकने घेतला पेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील डवरगाव…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
ठाण्यात पोलीस दलातील शहीद जवानांना श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - २१ ऑक्टोबर १९५९ रोजी…
-
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
नागपूर मध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
पोलीस कॉन्स्टेबलची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती पोलीस…
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामाजिक न्याय व विशेष…
-
माचीसच्या डब्ब्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला पेट
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ / प्रतिनिधी - यवतमाळच्या पांढरकवडा…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, समाजसेवक राजभवन येथे सन्मानित
मुंबई/प्रतिनिधी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी नवी मुंबई तसेच…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…