महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
यशोगाथा लोकप्रिय बातम्या

आई वडिलांच्या काबाड कष्टाला आले फळ,मुलगा झाला फौजदार


नेशन न्यूज मराठी टीम.

सोलापूर/प्रतिनिधी – आई वडिलांनी पोराला मोलमजुरी करून शिकवले.मुलाच्या शिक्षणासाठी मिळेल ते काम केले. तब्बल सात वर्षे मोहोळचा झहीर शेख कोल्हापूरात राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. सात वर्षांच्या खडतर प्रवासाबाबत सांगताना झहिरचा कंठ दाटून आला. आई वडिलांनी माझ्यासाठी जे केले त्यांचे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. असं झहीर सांगत होता. माझ्या खानदानात मी पहिला पदवीधर आहे आणि माझ्या खानदानात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणार देखील पहिलाच आहे असे झहीर शेखने सांगितले. सात वर्षांच्या अथक परिश्रमानंतर झहीरची पीएसआयपदी निवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका छोट्याशा किराणा दुकानचालकाचा मुलगा फौजदार झाल्याने संपूर्ण तालुक्यात कौतुक केले जात आहे.

पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोहोळ या ठिकाणी झाले. 11,12 वी विज्ञान विषयातून पास झाल्यानंतर बीएससीचे पदवी महाविद्यालय गावात नव्हते. त्यामुळे बीकॉम विषयातून पदवी घेतली. पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत काय करायचे, ध्येय काय याबाबत झहीरने अजून ठरवले नव्हते. फक्त क्रिकेट खेळण्याशिवाय काहीही सुचत नव्हते, असे झहीरने बोलताना माहिती दिली. एकदा आईने विचारले काय करणार आहेस, क्रिकेट खेळण्याने पोट भरत का? काही तरी नोकरी बघ घरासाठी हातभार लाव असे सांगितले. आईचे हेच वाक्य मनावर कोरुन त्याने स्पर्धा परीक्षा दिली. मोठा अधिकारी होण्याचं ठरवलं. अधिकारी होण्यासाठी क्लास अशी भीती मनात तर होतीच. या भीतीला तिलांजली देत, कोल्हापूरात असलेल्या नातेवाईकांकडे जाऊन, रूम घेऊन अभ्यास करण्याची इच्छा झहीरने आईकडे व्यक्त केली. झहीरला परगावी पाठवून अभ्याससाठी व जेवणाचा खर्च देखील उचलण्याची आई वडिलांची परिस्थिती नव्हती. तरीही आई वडिलांनी झहीरच्या पाठीशी खंबीरपणे साथ देत मोलमजुरी केली. किराणा दुकानातून घरखर्च व झहीरच्या अभ्यासाच खर्च भागत नसल्याने वडील हकीम शेख यांनी मोलमजुरी केली. तब्बल सात वर्षे, झहीरला आई वडिलांनी खंबीरसाथ दिली.

परिवारात कोणी पदवीधर झालं नाही व पीएसआय झालं नाही आणि ते मी साध्य केले –
झहीर शेख याच्या वडिलांच्या व आईच्या परिवारात पदवीधर होणारा झहीर हा पहिला तरुण आहे. झहीर शेख याने सात वर्षे अथक परिश्रम घेत स्पर्धा परिक्षांचा अभ्यास केला. माझ्या परिवारात फौजदार होणारा मी पहिलाच तरुण आहे, आईवडिलांसाठी काही करु शकलो याचा मला मोठा आनंद आहे, असे झहीरने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×