नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागात अपुऱ्या पावसाचे परिणाम दरवर्षीच शेतकरी व सामान्य नागरिकांना सहन करावे लागत आहेत. पाणलोट क्षेत्र पुरेसे न भरल्याने वर्षभर पुरेसा होईल असा पाण्याचा साठा नसल्यने प्रशासनाला पाणी कपात करावी लागते. परंतु गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने समाधान व्यक्त केले जात आहे. व धबधबा परिसरातील हिरवाईचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पाऊले पाण्याकडे वळू लागली आहेत.
दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे बीडच्या पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील धबधबा प्रवाहित झाला आहे.यंदा जास्त पाऊस न झाल्याने विंचरणा नदी कोरडीच होती. परिणामी या नदीवरील असलेला हा धबधबा कोरडा होता.परंतु गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने धबधबा प्रवाहित झाले आहे.तसेच या परिसरातील हिरवाई पर्यटकांना आकर्षित करू लागली आहे.