नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – सध्या विदर्भात कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु आहे. अमरावती जिल्ह्यातील वलगावच्या संत तुकडोजी महाराज यांच्या समाधी मंदिरावरून या जनसंवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. ही जनसंवाद यात्रा तिवसा मध्ये शहीद स्मारकावर अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभेला सुरवात करण्यात आली. या यात्रेला सुरुवात होताच सहभागी आमदार यशोमती ठाकूर यांनी राज्यात व जिल्ह्यात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर चांगलीच तोफ डागली.
तिवसा विधानसभेचे आमदार यशोमती ठाकूर यांनी राज्यासह जिल्ह्यात शेतकरी, शेतमजूर अंगणवाडी सेविका, मदतनीस, विजेचा प्रश्न असो हे सोडून जातीपातीचं राजकारण करीत आहे. हरमन कंपनी मी आणली अशी बतावणी करत खोटं बोलायचं, अशी टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर अप्रत्यक्षपणे केली. नवनीत राणा यांनी खोटं बोलणं सोडावे, हरमन कंपनी ही काँगेसच्या मालकाची आहे, असे देखील वक्तव्य आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा येथे जनसंवाद पदयात्रे दरम्यान केले आहे.