महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

डान्सबारची हौस करण्यासाठी करत होता घरफोड्या,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – डान्सबारमध्ये मजा करण्याची सवय लागल्याने ही हौस पूर्ण करण्यासाठी एक उच्चशिक्षित तरुण घरफोडी करण्याकडे वळाला. कल्याण परिसरात दिवसा घरफोडी करणाऱ्या या सराईत चोरट्यास पकडण्यात कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. रोशन जाधव असे या आरोपीचे नाव असून डोंबिवलीतील निळजे गाव येथे राहणारा आहे. या तरुणाने पत्रकारीतीचे उच्चशिक्षण घेतले असून काही वर्षे तो एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होता. त्याच्याकडून एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले असून ४७ तोळे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप, एक मोबाईल फोन दोन घड्याळ असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हददीत मोहने परिसरात एका घरामध्ये अज्ञात आरोपीने दिवसा घरफोडी चोरी करुन सुमारे ३५ तोळे सोन्याचे चोरी केले होते. याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच गेल्या महिनाभरात दिवसा घरफोडी चोरी करण्याच्या घटना परिसरात सतत घडत होत्या, त्याबाबतही पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. दिवसा घरफोडी करुन चोरी करण्याच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील लोकांच्या मनामध्ये भिती निर्माण झाली होती.

परिसरातील उपलब्ध सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच तांत्रीक कौशल्याच्या आधारे प्राप्त माहितीनुसार गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ४८ तासात खडकपाडा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी ८ एप्रील रजी शहाड, कल्याण पश्चिम परिसरात सापळा लावुन एका संशईत इसमास शिताफीने ताब्यात घेतले.

या इसमाकडे चौकशी केली असता त्याने ठाणे जिल्ह्यात मोहने, आंबिवली, टिटवाला, शहापुर परिसरात दिवसा घरफोडी चोरी करुन गुन्हे केल्याचे सांगितले. तसेच हा आरोपी दिवसा घरफोडी चोरी करणरा सराईत गुन्हेगार असुन तो वॉचमन नसलेल्या इमारतीत दिवसा एकटा घुसुन घरफोडी करत असे. अटक आरोपीताकडून नमूद गुन्हयाचे केले तपासात एकूण ८ गुन्हे उघडकीस आणुन त्यातील ४७ तोळे (४७० ग्रॅम) सोन्याचे दागिने, १ लॅपटॉप, १ मोबाईल फोन, दोन घडयाळ हस्तगत करण्यात खडकपाडा पोलीस ठाण्यास यश मिळाले आहे.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहा. पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, नंदकुमार कॅचे, तपास पथकाचे अधिकारी सपोनि अनिल गायकवाड, व तपास पथकाचे अंमलदार सहा.पो.उप.निरी. मधुकर दाभाडे, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, पोहवा अशोक पवार, नवनाथ डोंगरे, जितेंद्र सरदार, संजय चव्हाण, राजु लोखंडे, संदिप भोईर, योगेश बुधकर, सुधीर पाटील, पोशि राहुल शिंदे, अनंत देसले, कुंदन भांबरे, अविनाश पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×