नेशन न्यूज मराठी टिम.
यवतमाळ/प्रतिनिधी – यवतमाळ जिल्ह्यात 21 व 22 जुलै रोजी झालेल्या ढगफुटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी महागाव तालुका तिवरंग येथील शेतकरी गेला आहे. नामदेव संभाजी वाघमारे (वय ५२ ) या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृतक शेतकऱ्याच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःच्या नावाने तीन एकर शेती आहे. व त्यांना तीन अपत्य आहेत. त्यांच्यावर खाजगी आणि शासकीय असे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे कर्ज होते. सततच्या नापिकेने आणि झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांनी ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मुलाने दिली.
शासनाने थातुरमातुर पंचनामे करून कुठल्याही प्रकारची अद्याप मदत केली नाही म्हणून हा बळी गेल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे.याची गंभीर दखल घेत शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी म्हणजे अशा घटना पुनः घडणार नाहीत.