नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळेच वळण आले आहे. कारण आपल्या पक्षाच्या प्रचाराबरोबर राजकीय नेते विरोधी पक्षावर वारंवार टीका आणि आरोप लावण्यात मग्न झाले आहे. भिवंडी लोकसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे हे भिवंडीतून अपक्ष लढत आहे. त्यांना प्रहारचे बच्चू कडू यांनीही पाठिंबा दिला. निलेश सांबारे यांच्या प्रचारार्थ कल्याणात सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत बच्चू कडू यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी सभेत बच्चू कडू यांनी काँग्रेस-भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.
आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला ते म्हणाले “34 हजार एकरावर मुंबई शहर वासलेले आहे. पण मुंबईमधील सहा हजार एकर जमीन सहा लोकांच्या नावावर आहे. या जमिनीला सील का लावला जात नाही. जागेच्या कोंडीमुळे मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा माणूस साधा पायही पसरू शकत नाही. त्याला राहायला घर नाही. हा निवारा कुणी हिसकावला?” असा सवाल त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की “जर सहा हजार एकर जमीन सहा लोकांजवळ राहत असेल आणि कष्ट करणाऱ्या लोकांना घरे मिळत नसतील तर मग हे प्रश्न लोकांनी सत्ताधाऱ्यांना विचारायला हवे.
“धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये. त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबुतीने उभी राहिले पाहिजे असे बच्चू कडू यांनी कल्याण सभेत सांगितले. काँग्रेस आणि भाजपा हे दोघे धर्माचे नातेगोते जुळवतात. पण या भारतात कन्याकुमारीपासून ते काश्मीर पर्यंत ज्या हत्या झाल्या त्या शेतकऱ्याच्या आणि मजुराच्या झाल्या. बेरोजगारांनी आत्महत्या केल्या. मारणारा हिंदू आहे का मुसलमान याची शोधाशोध घेण्यापेक्षा मरतोय कोण हे महत्त्वाचे आहे. कुठल्यातरी विशिष्ट धर्मातल्या माणूस दंगलीत मेला तर त्याचा उहापोह होतो पण साडेतीन लाख शेतकरी आज आत्महत्या करून मरत आहे. याची साधी बातमी होत नाही याचे मला दुःख आहे.” अशी जहरी टीका बच्चू कडू यांनी सरकार वर केली.
भिवंडी येथील महाविकास आघाडीच्या सभेत अरविंद केजरीवाल यांनी चार तारखेनंतर भाजप जिंकले तर सुप्रिया सुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील असं वक्तव्य करत भाजपाला लक्ष केलं होतं. याबाबत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी अशा पद्धतीचे टोकाचे राजकारण सुरू आहे जो सोबत नाही आला, तर तो बाहेर निघेल असं होऊ नये. असं आदिलशाहीच्या काळात होत होतं. मोघलांचा फर्मान पाळला नाही तर लोकांना सरळ जेरबंद केले जायचे. मी वारंवार सांगतोय ईडी ची चौकशी फक्त एकाच पार्टीवर होत नाही. एकाच पार्टीचे लोक ईडी मध्ये का आत जात नाहीत? हा माझा साधा प्रश्न आहे. कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे. 5000 लाख चोरून पण पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसेल आणि पाच रुपये चोरले म्हणून त्याला आत टाकण्याची व्यवस्था केली जाते. जुलूमशाही आहे लोकशाही संपायची नसेल तर सगळ्यांनी विचार केला पाहिजे असे आवाहन बच्चू कडू यांनी मतदारांना केले आहे.