नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नांदेड/प्रतिनिधी – नांदेड जिल्ह्यातील लोहगाव येथील शेतकऱ्याने तुरीच्या शेतात झेंडूच्या फुलांची शेती केली आहे. लोहगावातील माधव कोळनुरे या शेतकऱ्यांने आपल्या 3 एकर शेतात तुरीचे पीक घेतले आहे. त्याला जोडव्यवसाय म्हणून झेंडूच्या फुलांची शेती केली आहे. साधारण 50 हजार खर्च यावर करण्यात आला आहे.
या शेतीतून पुढील येणाऱ्या सणांच्या काळात साधारण 4 ते 5 लाखाचे उत्पन्न होणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्याला आहे. तर शेतकऱ्याने एकाच पिकावर अवलंबून न राहता जोड शेती करून नगदी पिकेही घ्यावीत व शेतकऱ्याने आर्थिक किमया साधावी असा सल्लाही माधव कोळनुरे या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांना दिला आहे.