नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नांदेड/प्रतिनिधी– शेतकरी राजा हा नेहमी आपल्या रक्ताचे पाणी करून शेती पिकवतो आणि जगाचे पोट भरतो. पण काबाड कष्ट करून सुद्धा या आपल्या बळी राजाला दोन वेळची भाकरी मिळत नाही. नेहमीच हातातोंडाशी आलेला घास त्याच्या पासून हिरावला जातो. मग कारण असते ते नक्काली बियाणे, किवा निसर्गाचा कोप त्यात जास्त पाऊस असो किवा दुष्काळ यात नुकसान होते ते बळिराजच.
तरी पण येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत सकटांशी दोन हात करत हा बळी राजा जगाचा पोशिंदा होतोय. पारंपरिक शेतीला बगल देत नांदेड येथील शेतकऱ्याने शेवग्याची लागवड केली आहे. शेवगा लागवडीतून या शेतकऱ्याने लाखो रुपयांचे उत्पन्न कमावत आपली आर्थिक किमया साधली आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी या गावातील नंदकुमार गायकवाड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नंदकुमार गायकवाडने आपल्या दोन एकर शेतीमध्ये शेवग्याची लागवड केली आहे. लागवडीनंतर शेवग्याचे योग्य नियोजन केले आहे.
शेवगा लागवडीसाठी त्यांना 55 हजार रुपयांचा खर्च आला आहे. आता शेवगा शेंग तोडणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच लागवड खर्च वजा करता गायकवाड यांना 2 लाख रुपयांचा नफा झाला आहे. शेंग तोडणी सुरू असून अजून यातून 3 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. पुढील पाच वर्षे या शेवगा लागवडीतून उत्पन्न मिळणार असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले आहे.
तेच बरोबर पारंपरिक शेतीला बंगाल देत प्रत्येक शेतकाऱ्याने आपल्या शेतीत आधुनिक पद्धतीने शेती करून आपला आर्थिक विकास केला असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.