मुंबई/प्रतिनिधी – ‘तौक्ते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यातील 10752 गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले असून त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून 6040 गावातील वीजपुरवठा काल संध्याकाळ पर्यंत सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.
राज्यात जवळपास साडेपाच हजार विजेचे खांब पडले, तारा तुटल्या व जोरदार वारा व मुसळधार पावसाने फिडर ट्रिप झाले. अंधाऱ्या रात्री तिमिराची तमा न बाळगता व रात्रभर जागून नागरिकांना महावितरण कर्मचाऱ्यांनी सेवा दिली तसेच आताही वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.
राज्यात एकूण 1546 उच्चदाब पोल वादळामुळे पडले व क्षतीग्रस्त झाले. त्यापैकी 425 पूर्ववत व दुरुस्त करण्यात आले आहे. राज्यात एकूण 3940 लघुदाब पोल वादळामुळे पडले व क्षतीग्रस्त झाले त्यापैकी 974 पूर्ववत व दुरुस्त करण्यात आले आहेत. वादळ व पावसामुळे राज्यात 93 हजार 935 रोहित्रांमध्ये बिघाड झाला होता त्यापैकी 68 हजार 426 दुरुस्त करण्यात आले आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर अविरत काम करून चक्रीवादळामुळे अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत केला. या कामात स्थानिकांनी गावकऱ्यांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांना खूप सहकार्य केले. त्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी एक कृती आराखडा तयार करून विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच अधिकाधिक मनुष्यबळ या कामी लावण्याचे व लागणारी पुरेशी सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कोल्हापूर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आदींसाठी 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सध्या कार्यरत आहेत. तसेच विभाग स्तरावर 46 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नुकसानीची व्याप्ती बघता सुमारे 622 रोहित्रे, सुमारे 350 किमी लांबीचे केबल, तसेच साडे तीन हजार किमी इतक्या लांबीचे वायर्स व 20 हजार 500 खांब उपलब्ध करून दिलेले आहेत.
नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने 13 हजार तंत्रज्ञांची मोठी फळी मैदानात उतरवली आहे. ज्यामध्ये स्वतःचे 9 हजारहुन अधिक तसेच कंत्राटी पद्धतीवर कार्यरत 4 हजारहून अधिक इतके मनुष्यबळ सध्या वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यरत आहे. हे काम करताना पाऊस, सोसाट्याचा वारा, उन्मळून पडलेली झाडे, बिघाड असलेली दूरसंचार यंत्रणा, खराब झालेले रस्ते या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या कामासाठी 200 हून अधिक लहान मोठे ट्रक्स, सुमारे 50 क्रेन्स व जेसीबी मशीन आणि सर्व उपकरणांनी सज्ज अशा 200 चमू या कामासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.या चक्रीवादळामुळे राज्यातील जवळपास 46 लाख 41 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला तर 34 लाख 14 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून यामुळे 7 लाख 85 हजार 519 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 5 लाख 50 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले आहे. या चक्रीवादळाचा दुसरा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला असून यामुळे 7 लाख 73 हजार 760 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 5 लाख 10 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. पालघर जिल्ह्यात 5 लाख 88 हजार 743 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 2 लाख 44 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.
रत्नागिरी जिल्ह्यात 5 लाख 45 हजार 121 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 4 लाख 18 हजार 360 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 लाख 66 हजार 11 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 67 हजार 166 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. नाशिक जिल्ह्यात 3 लाख 29 हजार 304 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 2 लाख 72 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 2 लाख 96 हजार 965 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 2 लाख 49 हजार 601 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात 4 लाख 36 हजार 768 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता तर 4 लाख 8 हजार 89 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात 1 लाख 66 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 1 लाख 48 हजार 112 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात 1 लाख 55 हजार 543 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 1 लाख 53 हजार 715 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
विदर्भात एकूण 53 हजार 392 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर जवळपास 50 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात 1 लाख 5 हजार 142 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 1 लाख 3 हजार 924 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
Related Posts
-
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. हिंगोली/प्रतिनिधी - सध्या रब्बी पिकाला…
-
जिल्हा पुरवठा अधिकारी झाले "आयर्न मॅन"
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - मूळचे अहमदनगर…
-
वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे ठाकरे गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. धुळे/प्रतिनिधी- धुळे शहरात गेले महिन्या भरापासून…
-
जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करून ट्रकमालकाला सव्वा लाखाचा गंडा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - सध्या वेग वेगळे…
-
वीज कंपनीत मेघा भरती
प्रतिनिधी. मुंबई - ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास…
-
डोंबिवलीत वीज वितरण यंत्रणेला आग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला…
-
अनियमित वीज पुरवठ्याचा कापूस लागवडीवर परिणाम
DESK MARATHI NEWS ONLINE. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात…
-
वीज कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलिस कोठडी
उल्हासनगर/प्रतिनिधी - थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कंत्राटी वीज कामगाराला…
-
महावितरणने केडीएमसीच्या सिग्नल यंत्रणेची कापली वीज
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात…
-
परभणीत वीज पडून तीन ठार; तीन जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. परभणी/प्रतिनिधी - गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि…
-
चंद्रपुरात वीज कंत्राटी कामगारांच्या बेमुदत कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रात वीज…
-
लोकअदालतीतून वीज ग्राहकांची ३८८ प्रकरणे निकाली
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण,वसई,पालघर,तालुकास्तरावर नुकत्याच आयोजित राष्ट्रीय…
-
महावितरणच्या वसई विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. वसई / प्रतिनिधी - महावितरणच्या वसई…
-
एसबीआय मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO) शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : ०१ एप्रिल…
-
कल्याणात महावितरणची वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग- एक अंतर्गत वीज…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची उच्च न्यायालयात धाव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महावितरण कंपनीत EWS…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची कामगारांच्या पगार वाढीची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ प्रतिनिधी - वीज कंत्राटी कामगारांना…
-
लोड शेडिंग विरोधात वीज वितरण कार्यालयावर शिवसैनिकांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण आणि अंबरनाथ ग्रामीण परिसरातील मंलगगड…
-
वादळी वाऱ्यात शेतकाम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - हिमायतनगर तालुक्यातील…
-
वीज कंत्राटी कामगार संघांचे 'सरकार जगाव' अभियान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वीज कंत्राटी…
-
कामगारांच्या समस्या निवारणासाठी नोडल अधिकारी नियुक्त
मुंबई/ प्रतिनिधी - कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व इतर…
-
शहापूर परिसरातील २३ वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस…
-
लोकअदालतीच्या माध्यमातून वीज ग्राहकांची १९३० प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तालुकास्तरावर रविवारी आयोजित…
-
स्मशानभूमीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना जीव मुठ्ठीत घेऊन करावे लागते काम
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना रूग्णांसह मृतांचा आकडा…
-
पालघर, मोहने, टिटवाळ्यात वीज चोरट्यांना महावितरणच्या कारवाईचा शॉक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या अधिक वीजहानी…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - ‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन…
-
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर उर्ज्यामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधी. मुंबई - वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित…
-
अनधिकृत बांधकामाना विद्युत पुरवठा न देण्याबाबत केडीएमसीचे महावितरणला पत्र
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांविरोधात दंड थोपटले असून यापुढे…
-
लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा…
-
वीज दरवाढी विरोधात तेजश्री कार्यालयावर आपचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरण कडून लॉकडाऊन…
-
केडीएमसीच्या दिवाळी गिफ्टवाल्या अधिकारी कर्मचार्यांना पत्रकाद्वारे तंबी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालिकेत…
-
वीज ग्राहकांना लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी…
-
उल्हासनगर मध्ये वीज मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - मीटर रिडींग एजन्सीने ग्राहकांच्या वीज वापराची कमी नोंद…
-
भिवंडीत वाढीव वीज बिला विरोधात मनसे आक्रमक, फोडली टोरंट पावरची कार्यालये
प्रतिनिधी. भिवंडी - वाढीव वीज बिल तसेच सक्तीची वीज बिल वसुली खोट्या वीज…
-
वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नी दोन दिवसात होणार बैठक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील महानिर्मिती महावितरण…
-
अवकाळी पावसाने आसनगाव परिसरात वीज वितरण यंत्रणेची मोठी हानी
नेशन न्यूज मराठी टीम. शहापूर /प्रतिनिधी - गुरुवारी ०१ जून…
-
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयामार्फत रक्तदान शिबीर संपन्न
प्रतिनिधी. मुंबई - नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालयाच्या…
-
पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, समाजसेवक राजभवन येथे सन्मानित
मुंबई/प्रतिनिधी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी नवी मुंबई तसेच…
-
वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – ऊर्जामंत्री नितीन राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी - महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या…
-
टिटवाल्यात १० लाखांची वीजचोरी उघडकीस, २३ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील…
-
उद्या डोंबिवली व कल्याण पूर्वच्या काही भागात वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - वाढते तापमान आणि…
-
देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिमेच्या काही भागात उद्या वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…