नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली रस्त्याला पडलेल्या खड्यांची देशभर चर्चा सुरु असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. कल्याण डोंबिवलीतील असा एकही रस्ता शिल्लक नाही की त्यावर खड्डे नसतील. लहान मुलांपासून तर वृद्धान पर्येंत सर्वच नागरिक या खड्यांनी मेटाकुटिला आल्याचे चित्र सध्या कल्याण डोंबिवलीत आपणास बघायला मिळत आहे. मध्यंतरी एका तरुणाने रस्तावरील खड्ड्यात पोहत असतानाचा आपला व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यावरून कल्याण डोंबिवलीत नागरिक या रस्तावरील खड्ड्यांनी किती त्रस्त आहेत हे कळून येत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात महापालिकेचा कर भरतात असे असतांना त्यांच्या मोबदल्यात मात्र त्यांना योग्य सुविधा मिळत नसल्याचे स्पष्ट जाणवत आहे. कल्याण डोंबिवली शहरात सध्या पडलेल्या खड्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. ठिकाणी अपघात होत आहे.याच पार्श्वभूमीवर या सर्व परिस्थितीला सर्वस्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन व येथील सत्ताधारी पक्ष जबाबदार आहेत.असा आरोप वंचितने केला. म्हणून या दोघाच्या निषेधार्थ कल्याण – डोंबिवलीकरांना दर्जेदार रस्ते मिळावे या प्रमुख मागणीसाठी पक्ष प्रमुख अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. व प्रशासनाकडे पुढील विविध मागण्या केल्या.
१) कल्याण डोंबिवली शहरासहीत २७ गावाच्या रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटीकरण करणे काही जागी चालू असलेले काँक्रीटीकरण धिम्या गतीने चालू आहे ते जलद गतीने करणे.
२) सध्या अस्तित्वात असलेल्या डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे जेथे खड्डे पडले आहेत त्या रस्त्यावर डांबर पॅच न करता खोदून नवीन रस्ते बनवणे जेणे करुन
जास्त काळ रस्ते टिकतील. ३) खड्यामुळे जखमी झालेल्या नागरिकांना वैद्यकीय सेवा बरोबरच त्यांच्या वाहनाची झालेली नुकसान भरपाई द्यावी.
४) खड्यामुळे मृत झालेल्या नागरिकाच्या घरच्या व्यक्तींना आर्थिक मदतीची अर्थसंकल्पात तरतूद करावी.
५) कल्याण डोंबिवली शहरात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे.
६) निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधणी करणाऱ्या कंत्राटदाराना पाठीशी घालणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी.
या वेळी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.