महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

ओबीसींच्या आरक्षणाची टक्केवारी कमी न करता, मराठा समाजाला आरक्षण द्यावे ओबीसी समाजाची मागणी

नेशन न्यूज मराठी टीम.

धुळे / प्रतिनिधी – मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पंरतू राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देतांना महाराष्ट्रातील ओबीसींच्या मुळ आरक्षणात कपात करू नये. ओबीसी आरक्षणास कोणतीही बाधा न पोहोचता, आरक्षण टक्केवारी कमी न करता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी आज धुळ्याचे माजी प्रथम महापौर तथा समाजाचे अध्यक्ष भगवान बापूजी करनकाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा तिळवण तेली समाजाकडून करण्यात आली.

धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या कडे मागणी करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वच ओबीसी हे मराठा समाजा सोबतच आधी पण होते आणि आज ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मराठा जेही आंदोलन करतील आम्ही त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही, यावेळी माजी प्रथम महापौर भगवान करनकाळ यांनी यावेळी दिली. भगवान करनकाळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्यात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जशी ओबीसी समाजाची देशात मागणी आहे, तशी मराठा समाजाची महाराष्ट्रात मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांचे शांतेत आंदोलन चालू असतांना ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. त्यामुळे संपुर्ण राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून त्यांना समस्त ओबीसी समाजाचा पाठींबा आहे. पंरतू मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाची टक्केवारी कमी करणे आम्हाला मान्य नाही. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावी, अशी आमची मागणी असल्याचेही ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आमचा पाठींबाच आहे. ओबीसी समाजाचे २७ टक्के आरक्षण आहे, त्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता, आरक्षणात कपात न होता, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे महापौर प्रतिभा चौधरी यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×