नेशन न्यूज मराठी टीम.
कोल्हापूर / प्रतिनिधी – महाराष्ट्रात सध्या मुंबई येथे होवू घातलेल्या सर्वपक्षीय इंडिया आघाडीच्या बैठकीची चर्चा आहे. पक्ष नेते मुंबईत दखल होवू लागले आहेत. विविध राजकीय पक्षांना याबैठकीचे बोलावणे आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ह्यांना देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण आले होते. त्यानिमित्तानी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले कि,इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आले होते. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय अजून झालेला नाही.
पुढे ते म्हणाले कि, एप्रिल 2021 मध्ये महाविकास आघाडीसोबतचे संबंध तोडल्यानंतर नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधेलेला नव्हता. किमान महाविकास आघाडी का सोडली हे तरी महाविकास आघाडीतील नेत्यांनी विचारायला हवे होते. परंतु तसा काही संवाद झाला नाही आणि आम्ही ही त्याचा पुर्नविचार केला नाही.महाविकास आघाडीतील जवळपास सर्वच घटक पक्ष इंडिया आघाडीत गेले आहेत, मात्र स्वाभीमानी शेतकरी संघटनेने तसा निर्णय घेतलेला नाही.
देशभरातील सर्व शेतकरी संघटनेने एकत्र येवून एमएसपी गँरटी मोर्चा स्थापन केलेला आहे. त्याचा घटक स्वाभीमानी शेतकरी संघटना आहे. याची 19 ऑगस्टला बैठक झाली ,यामध्ये जोपर्यंत एमएसपी गँरटी नाही तोपर्यंत मत नाही,कोणताही निर्णय नाही अशी भूमिका घेण्यात आली. जो काही निर्णय होईल तो 27 राज्यातील शेतकरी संघटना घेतील. त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही. असे शेट्टी म्हणाले.