Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
पोलिस टाइम्स महत्वाच्या बातम्या

चाकूने भोसकून पत्नीची हत्या करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने सुणावली जन्मठेपेची शिक्षा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

बुलढाणा/प्रतिनिधी – पती पत्नीच्या सुखी संसारात संशय नावाचे फूल उमलले कि नात्यात अनेक मोठी वादळे येतात. ही वादळे इतकी भयानक असतात की आवडत्या व्यक्तीला मारताना सुद्धा हात कापत नाहीत. जालन्यात राहणाऱ्या गजानन जाधव याचे पूर्ण कुटुंबं एका क्षणात उध्वस्त झाले. कारण होते ते म्हणजे त्यांनी पत्नीच्या चारित्र्यावर घेतलेला संशय. या संशयातून त्याने आपल्या पत्नीची अमानुषपणे हत्या केली.

2011 मध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव (रा.जालना) याच्यासोबत मृत महिलेचे लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना तीन मुली झाल्या. परंतु आरोपी गजानन हा नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत. त्याचबरोबर तो पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ सुद्धा करत होता. पीडित महिलेचे वडील सुरेश तायडे हे नेहमी आपली मुलगी व जावई गजानन यांस समज देत. पण पतीच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने आपल्या मुलींसह पळ काढला. ती एक ते दीड महिन्यापूर्वी आपल्या मुलींसह माहेरी आली. पण काही दिवसातच तिचा पती आरोपी गजानन हा जालन्यावरून बुलढाण्यात आपल्या सासरी आला. रात्री जेवण करून फिर्यादीच्या घरी अर्थात सासरी मुक्कामी थांबला होता.

9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास महिलेचे वडील सुरेश तायडे व त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेले होते. महिलेच्या दोन्ही मुली घराबाहेर खेळत होत्या. महिला घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपी गजानन जाधव याने तिच्यावर दोन चाकूंच्या मदतीने आठ वेळा वार केले. या दरम्यान महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या आरोपीने आपल्या दोन्ही मुलींसह संगम तलावामध्ये उडी घेत जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बुडण्यापासून नागरिकांनी वाचवले. पोलिसांनी आरोपी गजानन जाधव याला पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या. जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा येथे आरोपीविरुद्ध खटला सुरू झाला. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी याला आजीवन जन्मठेपेची शिक्षा आणि 16 हजार पाचशे रुपयांचा दंड ठोकल्याची माहिती जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील व्ही. एल. भटकर यांनी दिली आहे.

Translate »
X