महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

केंद्र सरकारने मराठा आरक्षण मर्यादा वाढीचे विधेयक आणावे ट्रीपल इंजिननेही घ्यावा पुढाकार – राजेनिंबाळकर

नेशन न्यूज मराठी टीम.

बुलढाणा / प्रतिनिधी – केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे . त्यावर ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार, शिवसेना ठाकरे गट यांनी आपले मत व्यक्त करत म्हटले कि, केंद्र सरकारने शेवटच्या क्षणी संसदेचे विशेष अधीवेशन उद्या सोमवारपासून भरवले आहे मात्र हे अधिवेशन जनतेसाठी नसून केवळ सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे. विशेष अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना किंवा इतर संसदीय आयुधांना वेळ न देता केवळ शासकीय अजेंडा आला आहे.

त्यातही सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणुक आयुक्त नियु्क्तीबाबत निर्देश दिले असताना केवळ सध्या सांगकाम्याप्रमाणे निर्णय घेणारा आपला आयुक्त राहावा म्हणून विधेयक आणलं जात आहे. मराठा आरक्षणासाठी आरक्षण मर्यादा वाढ विधेयकाची आम्ही अनेक दिवसांपासून मागणी करत असून राज्याच्या ट्रिपल इंजिन सरकारने जरांगे पाटील यांना दिलेले व ओबीसी आंदोलकांना दिलेले आश्वासन पुर्ण करण्यासाठी राजकीय वजन वापरून विधेयक आणावे. मराठा समाज रस्त्यावरचे आंदोलन करत असून आपण त्यांचा सदस्य म्हणून संसदेतही आवाज उठवू, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×