नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक औरंगाबाद येथे पंचतारांकित हॉटेल मध्ये आयोजित केली गेल्याने चांगलीच चर्चेत आहे. या बैठकीवर ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्यांच्या मते कालचं बजेट फक्त जुमलेबाजी आहे. आणि केंद्रातल्या दोघांची सावली महाराष्ट्राच्या तिघांवर पडली अशी स्थिती आहे. ते पण अच्छे दिनचा जुमला होता. हा सुद्धा आकडेवारीचा जुमला आहे. याच्या पलीकडे काही नाही. कालची मंत्रीमंडळाची बैठक ही शेतकर्यांना दुष्काळ जाहीर करण्याची नव्हती. शेतकऱ्यांना काही देणारी नव्हती महाराष्ट्रातील दलितांना काही देणारी नव्हती, एकही रूपया मराठवाड्यातील दलितांसाठी जाहीर झाला नाही.
अॅट्रॉसिटी अॅक्टचा निधी प्रलंबित आहे. घरकुलचा निधी प्रलंबित आहे. घरकुल अर्ध्यावर बांधून पडलेले आहेत, अशी स्थिती आहे. मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती जमातींना डावलण्याचं काम कालच्या मंत्रीमंडळ बैठकीतून झालंय आणि धक्कादायक म्हणजे सोळाशे वीस करोड रुपये मंदिरांच्या विकासासाठी दिलेत परंतु अँट्रासिटी अँक्ट मध्ये जखमी झालेल्या हत्याकांड झालेल्या फायली समाज कल्याण खात्यात धूळ खात पडल्या आहेत. तेथे निधी नाही म्हणून सांगितले जाते, तिथे एकही रूपया दिलेला नाही. कालची मंत्रीमंडळाची बैठक ही मंदिर विकास मंडळाची बैठक होती असं मी जाहीर करतो, असे वक्तव्य दिपक केदार यांनी केले आहे.