नेशन न्यूज मराठी टीम.
रत्नागिरी / प्रतिनिधी – परतीच्या पावसाने समुद्र खवळला कि दूर समुद्रात आत मासेमारी करून समुद्र किनारा गाठणाऱ्या स्थानिक मच्छीमारांना जीव मुठीत घेवून हा सागर प्रवास करावा लागतो. आत समुद्रात बोटीला धडक लागून गळती सुरु होवून बोट बुडण्याच्या घटना वेळोवेळी ऐकू येत असतात. अशीच घटना रत्नागिरी येथे घडली आहे.
रत्नागिरीच्या जयगड समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. बोटीवरच्या सर्व खलाशांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. नौका बुडाल्यामुळे मच्छीमाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बोटीवरचा सर्व थरार स्थानिक मच्छीमारांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे.