नेशन न्यूज़ मराठी टिम.
वर्धा/प्रतिनिधी – वाढदिवसाला केक कापताय आणि सोबतच विविध स्प्रे आणि फायर गन चाही वर्षाव करताय. तर जरा जपून. हे सांगायचे करण म्हणजे वर्ध्यात वाढदिवसाचा केक कापताना असाच फायर गन आणि विविध स्प्रेचा वापर पार्टीमध्ये केलाय. आणि केक कापताना बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागलीय. वर्ध्याच्या सिंदी मेघे येथे हा धक्कादायक प्रकार घडला.
बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागतानाचा हा व्हिडीओ हाती लागला आहे. रितीक वानखेडे असं बर्थडे बॉयचं नाव असून तो काल सायंकाळी आपल्या मित्रांसोबत केक कापत होता. केक कापताना स्प्रे तोंडावर मारला गेला. याचवेळी ‘फायर गन’ मधून निघालेली ठिणगी स्प्रेवर पडल्याने आग लागलीय. बर्थडे बॉय रितीक किरकोळ जखमी झाला, त्याच्यावर उपचारही झाले आहेत. त्याच्या कानाला आणि नाकाला किरकोळ जखम झाली आहे. पण हे थोडक्यात निभावले आहे.अन्यथा मोठा अपघात होन्याची शक्यता होती.
बर्थडेला जर आपण स्प्रे आणि फायर गनचा वापर करत असाल तर योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.अन्यथा आपण अपघाताला निमंत्रण देत आहात.