महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

मालेगावात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीच्या घोषणेचे केले जोरदार स्वागत

नेशन न्यूज मराठी टीम.

मालेगाव/प्रतिनिधी – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीने महाराष्ट्रातील राजकारणाचा आज नवा अध्याय सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झाली. त्यामुळे सबंध महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केलाय.मालेगावात ही वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व जिल्ह्याच्यावतीने शहरातील मोसम पूल येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी, नाशिक पूर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ अहिरे, प्रबुद्ध भारताचे जितरत्न पटाईत, जिल्हा सचिव राजुभाऊ धिवरे, राजेंद्र पवार सर, सुनील अहिरे, सिद्धार्थ उशीरे, दिलीप सोनवणे, किशोर निकम, आलीम शेख, कादिर शेख, विजय बिऱ्हारे, संदीप महिरे, सुरेश अहिरे, निकिता गरुड, संगीता पाटील, स्वाती पवार, संतोष अहिरे, संतोष बोराळे, प्रवीण उशीरे, संतोष जगताप, विनोद जगताप, सचिन अहिरे, विशाल अहिरे, शिवसेनेचे पदाधिकारी नथू बाबा जगताप ,जितेंद्र देसले ,प्रवीण देसले, विष्णू पवार , भरत पाटील ,कैलास तिसगे ,नंदू पाटील , क्रांती पाटील, अजय जगताप ,नंदू वर्मा ,भीमा गवळी ,कपिल परदेशी ,संदीप अभोनकर ,गंगाधर जाधव ,नरेंद्र जगताप ,युवासेना महानगर प्रमुख सनी जगताप ,आबा पवार ,शेखर हिरे ,मयूर पाटील ,ऋषी सोनार ,यांनी येथे एकत्रित येऊन महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व मिठाई वाटून आनंद साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×